नाशिकमध्ये बुलढाण्याच्या जलतरणपटूंचा डंका; राष्ट्रीय स्पर्धेत पदकांचा पाऊस !

Screenshot_2026-02-02-14-07-41-30_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

नाशिक/बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज )नाशिक येथे दि. ३० जानेवारी २०२६ रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्याच्या खेळाडूंनी आपल्या अचाट कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध वयोगटांत आणि प्रकारांत सहभाग नोंदवत या खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकांची लयलूट केली असून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी विठ्ठल रामभाऊ चव्हाण यांनी ५० मीटर फ्री स्टाईलमध्ये सुवर्णपदक, २०० मीटर IM मध्ये रौप्य आणि ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकावून ‘वय ही केवळ एक संख्या आहे’ हे सिद्ध केले.

तसेच, महाराष्ट्र परिवहन महामंडळ (MSRTC), मलकापूर आगारातील महिला चालक/वाहक सोनाली पाटमासे यांनी ५० मीटर बॅक स्ट्रोकमध्ये सुवर्ण, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोकमध्ये रौप्य आणि १०० मीटर फ्री स्टाईलमध्ये कांस्य पदक जिंकून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.
कोषागार कार्यालय बुलढाणा येथील लेखा अधिकारी विष्णुभगवान गाढे यांनी ४०० मीटर फ्री, १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि २०० मीटर (IM) अशा तिन्ही प्रकारांत कांस्य पदक पटकावले.
प्रसिद्ध डॉ. मंगेश पाटील यांनी १०० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक आणि ५० मीटर बॅकस्ट्रोक अशा दोन्ही प्रकारांत रौप्य पदकाला गवसणी घातली. तसेच, अनुप मंगेश पाटील याने ५० मीटर बॅक स्ट्रोक प्रकारात रौप्य पदक मिळवून आपल्या खेळाचे प्रदर्शन केले.
विठ्ठल चव्हाणः १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
सोनाली पाटमासेः १ सुवर्ण, १ रौप्य, १ कांस्य
डॉ. मंगेश पाटीलः २ रौप्य
विष्णुभगवान गाढेः ३ कांस्य
अनुप पाटीलः १ रौप्य
या सर्व यशस्वी खेळाडूंचे प्रशासकीय अधिकारी, क्रीडा प्रेमी आणि जिल्हावासीयांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे बुलढाणा जिल्ह्यातील आगामी जलतरणपटूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे.

You may have missed

error: Content is protected !!