नारायणराव नागरे महाविद्यालयातील 12वी मधील विद्यार्थ्यांना निरोप समारंभ
सिंदखेडराजा अनिल दराडे आज दिनांक 03 फेब्रुवारी 2026 रोज मंगळवारला नारायणराव नागरे महाविद्यालय दुसरबीड येथे निरोप समारंभ पार पाडण्यात आला. या कार्यक्रमासाठी वर्ग 12 विज्ञान व कलाच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. दिपक देशमाने यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली तसेच या कार्यक्रमासाठी प्रा. सुधाकर तारे तसेच प्रा. बी. डी. शिंदे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य तथा अधिसभा सदस्य व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. विजय नागरे सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते त्यांनी इयत्ता 12 वीच्या विद्यार्थ्यांना निरोप घेत असताना महाविद्यालयाच्या आठवणी शिकवण तसेच चांगले नागरिक होण्यासाठी प्रेरित केले व पुढील 12 वीच्या बोर्डाच्या पेपरसाठी शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन प्रा. मेहेर सर यांनी केले तसेचया कार्यक्रमासाठी प्रा. देवानंद नागरे प्रा. मिलिंद गवई प्रा. सत्यम श्रीवास्तव प्रा. महेश कायंदे श्री गजानन मुंडे श्री अनिल गायकवाड श्री अनिल रणमाळे श्री भाऊराव पंढरे तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
