भीषण अपघातात राजूरचा तरुण ठार, तर मुक्ताईनगरचा तरुण गंभीर,निंबारी फाट्यावर दुचाकींची समोरासमोर धडक…

Screenshot_2026-02-03-15-03-06-55_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मलकापूर ( बुलढाणा माझा न्युज ): मलकापूरवरून बुलढाण्याकडे जाणाऱ्या रोडवर असलेल्या निंबारी फाटा नजीक राजवीर पेट्रोल पंपा समोर दोन दुचाकींमध्ये झालेल्या समोरासमोरील धडकेत राजूर येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा ऑन द स्पॉट मृत्यू झाला. तर मुक्ताईनगर येथील तरुण गंभीर जखमी झाला. आज २ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान ही घटना घडली. वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक झाली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली केली जात आहे.

मलकापूर येथील डिलक्स फर्निचर येथे कारपेंटर म्हणून कामाला असलेले आणि राजूर येथील रहिवासी असलेले शेख जावेद शेख हनीफ (वय ३५ वर्षे) हे दररोज राजूर येथून मलकापूर येथे उप-डाउन करतात. आज २ फेब्रुवारी रोजी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपले काम आटोपून ते आपली दुचाकी क्रमांक एमएच-२७-के-४३९५ वर स्वार होऊन मलकापूर येथून राजूरकडे जात होते.दरम्यान, निंबारी फाट्या नजीक असलेल्या राजवीर पेट्रोल पंपा समोर विरुद्ध दिशेने म्हणजेच दाताळाकडून मलकापूरकडे दुचाकी क्रमांक एमएच-१९-सीएच-६०२ वर येणाऱ्या शेख जावेद यांच्या गाडीसोबत त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की, दोन्ही गाड्यांचे चालक बॉल सारखे हवेत उसळल्या जाऊन रस्त्यावर फेकल्या गेले आणि दोघेही दुचाकी चालक रक्ताच्या थारोळ्यात पडले. अपघात घडताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही जखमींना तातडीने मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तपासणी अंती शेख जावेद शेख हनीफ यांना मृत घोषित केले. तर दुसरी दुचाकीस्वार सागर सुधीर झांबरे (वय ३६ वर्षे) रा. मुक्ताईनगर जि. जळगाव) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.घटनेची माहिती मिळताच मलकापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला सारत वाहतूक सुरळीत केली. वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी पोलिसांत कोणताच गुन्हा दाखल झाला नव्हता. शेख जावेद यांचा असा दुर्दैवी अंत झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!