मेरा बु येथील मेरा फाटा येथील विकासकामे करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या कडे अर्ज. तांत्रिक अडचणीमुळे विकास कामे थांबली होती लवकरच मेरा बु फाटा येथे विकास कामे सुरू करणार. गजानन वायाळ

IMG-20260204-WA0054

चिखली (एकनाथ माळेकर ) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथील मेरा बु फाटा येथील रस्ते व नाल्या आणि इतर विकास कामासाठी मेरा बु फाटा येथील ग्रामस्थांनी एका अर्जाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी बुलढाणा जिल्हाधिकारी बुलढाणा तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखली यांच्याकडे एका अर्जाद्वारे रस्ते नाल्या व इतर विकास कामाची मागणी केली आहे त्यामध्ये त्यांनी आमचे आरोग्यही धोक्यात आले असल्याचे माहिती सुद्धा दिली आहे त्यावर आमचे प्रतिनिधी यांनी मेरा बु येथील सरपंच प्रतिनिधी विकास पुरुष गजानन वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता विकास कामे भरपूर झाली आहे परंतु मेरा बु फाटा येथे काही तांत्रिक अडचणीमुळे तिथे विकास करता आला नाही अशी माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वायाळ यांनी दूरध्वनीवरून माहिती दिली आहे मेरा बु फाटा येथे सातशे ते आठशे लोकवस्तीचे नवीन गावठाण तयार झाले आहे परंतु तेथे विकास कामे करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या त्या सर्व व्यवस्थित करून लवकरच मेरा बु फाटा येथे विकास कामाला सुरुवात करण्यात येणार आहे मेरा बु फाटा येथे मेन विषय हा पिण्याच्या पाण्याचा होता तो काही दिवसापूर्वीच मार्गी लावला आहे आणि आता जो रस्त्याचा नाल्याचा विषय आहे तो सुद्धा येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर मार्गी लावू अशी माहिती राष्ट्रवादी उपजिल्हाप्रमुख विकास पुरुष गजानन वायाळ यांनी दूरध्वनीवरून दिली आहे. मेरा बु येथील 70 ते 80 लोकांनी एका अर्जाद्वारे मेरा बु फाटा येथे रस्ते आणि नाल्याचे बांधकाम करण्यात यावे . अशी मागणी मेरा बु येथील मेरा फाटा येथील ग्रामस्थांनी केली आहे

You may have missed

error: Content is protected !!