रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती…

Screenshot_2026-02-04-21-11-20-85_f541918c7893c52dbd1ee5d319333948

रोहणा (ता. खामगाव) मा. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या “अरुणोदय सिकलसेल ॲनिमिया विशेष अभियान” तसेच ‘कुसुम – कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र (स्पर्श)’ अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र रोहणा येथे नागरिकांची तपासणी करून समुपदेशन व व्यापक जनजागृती करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहासिनी शिरोडकर यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व तसेच कुष्ठरोगाबाबत असलेले गैरसमज दूर करून ‘स्पर्श’ अभियानाची उद्दिष्टे समजावून सांगितली. नागरिकांनी वेळेवर तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी श्री. धुताडमल यांनी मार्गदर्शन करताना ० ते ४० वर्षे वयोगटातील सर्व स्त्री-पुरुषांनी सिकलसेल तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. विशेषतः लग्नापूर्वी तपासणी करून घेण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले, जेणेकरून भविष्यातील आरोग्य जोखीम टाळता येईल.
कार्यक्रमात आरोग्य विभागातील कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये डॉ. एस. एल. शिराळकर (आयुर्वेदिक डिस्पेंसरी, वर्णा), सौ. वि. टी. माळे (LHV), सौ. वी. स. खाडे (AMM), सौ. एस. बी. भीमेवाल (AMM), श्री. परिमल उंदरे (MPW), श्री. जी. एस. लोड (परिचर), श्री. एस. डी. देशमुख (परिचर) यांचा समावेश होता. ग्रामस्थांमधून अविनाश महाले (रोहणा), दादा शामराव शास्त्री (वाघेरा), पांडुरंग शेळके आदी उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!