देऊळघाट परिसरात वनविभागाचा छापा; दीड लाखांचे अवैध सागवान जप्त

Screenshot_2026-02-05-17-35-56-43_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

बुलडाणा (बुलढाणा माझा न्युज ) तालुक्यातील देऊळघाट परिसरात अवैध सागवान साठवणूक आणि फर्निचर निर्मिती करणाऱ्या केंद्रावर वनविभागाने मोठी कारवाई केली आहे. बुधवारी (४ फेब्रुवारी) दुपारी टाकलेल्या या छाप्यात सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळघाट येथील बिरसिंहपूर रोडवर राहणारे रमेश नाना बोराळे (वय ६२) यांनी विनापरवाना सागवान लाकडाची साठवणूक केली असून, त्यापासून फर्निचर तयार केले जात असल्याची गोपनीय माहिती वनविभागाचे डीएफओ सरोज गवस यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाड टाकली.या कारवाईत वनविभागाने खालील साहित्य जप्त केले आहे.कापलेले सागवान लाकूड.लाकूड कटिंगसाठी वापरले जाणारे रंधा मशीन.एकूण अंदाजे किंमतः १ लाख ५० हजार रुपये आहे.
या प्रकरणी फर्निचर दुकान मालक रमेश बोराळे यांच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल प्रदीप मुंढे, वनरक्षक एस. बी. कराड, समाधान झोटे, चालक संदीप मडावी, प्रवीण सोनवणे, पवन वाघ, दीपक सोनवणे आणि रवींद्र तायडे यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

You may have missed

error: Content is protected !!