जालना-खामगाव महामार्गावर बस आणि दुचाकीचा भीषण अपघात; तीन तरुण गंभीर जखमी…

new-project-2025-10-15t091400518_1760499883

चिखली (बुलढाणा माझा न्युज) जालना-खामगाव महामार्गावर अमडापूर ते चिखली दरम्यान बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. दिवठाणा फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर भरधाव ‘लालपरी’ बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तीन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चिखली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
बुधवार, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वाजेच्या सुमारास बीड-अमरावती (MH-14 LX 8987) ही बस अमडापूर मार्गे अमरावतीच्या दिशेने जात होती.
त्याच वेळी मंगरूळ नवघरे येथील तीन तरुण त्यांच्या दुचाकीने (MH-28 CD 6703) चिखलीकडे येत होते. दिवठाणा येथील पेट्रोल पंपासमोर दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा मोठ्या प्रमाणावर चक्काचूर झाला आहे.
अपघात होताच परिसरातील नागरिकांनी आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींची अवस्था गंभीर असल्याचे पाहून स्थानिकांनी कोणताही विलंब न लावता त्यांना तत्काळ खासगी वाहनाने चिखली येथील रुग्णालयात हलविले. सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने तिघांचेही प्राण वाचले आहेत.

You may have missed

error: Content is protected !!