रस्त्यावरील मातीच्या ढिगाऱ्यामुळे घात झाला; एसटी बस थेट रस्त्या शेजारील खोल नालीत कलंडली,चार ते पाच प्रवासी जखमी…

Screenshot_2026-02-05-18-47-58-96_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

मोताळा (बुलढाणा माझा न्युज ) रस्त्याच्या रेंगाळलेल्या कामाचा फटका पुन्हा एकदा प्रवाशांना बसला आहे. मलकापूर ते कुऱ्हा गोतमारा दरम्यान धावणारी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची बस (क्रमांक MH 40 N 9486) आज सकाळी ११:३० च्या सुमारास रस्त्याशेजारील रस्त्याच्या कडेला कलंडली. या अपघातात बसमधील किमान चार ते पाच प्रवासी जखमी झाले असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे. सविस्तर वृत्त अशे की, सदर बस कुऱ्हा गोतमारा येथून मलकापूरकडे जात होती. धामणगाव बढे परिसरातील खेडी आणि कोऱ्हाळा दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. रस्त्याच्या एका बाजूने वाहतूक वळवण्यात आली होती, मात्र तेथे टाकलेल्या मातीच्या भरावाचा आणि खड्ड्यांचा अंदाज चालक सुरडकर यांना आला नाही. यामुळे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट रस्त्याशेजारील खोल नालीत जाऊन फसली.अपघात घडताच परिसरातील स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढून तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुदैवाने, काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

You may have missed

error: Content is protected !!