बनावट कीटकनाशका प्रकरणी विक्रेते व निर्मात्यांवर कठोर कार्यवाही करा – डॉ. गोपाल बच्छीरे
लोणार (यासीन शेख) येथील बनावट कीटकनाशक विक्री प्रकरणाची सखोल चौकशी करून विक्रेते व बनावट कीटकनाशक बनविणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करा अशी मागणी कृषिमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे यांना तहसीलदार लोणार यांच्यामार्फत निवेदन देऊन डॉ गोपाल बच्छीरे जिल्हा संघटक शिवसेना उबाठा यांनी केली आहे.बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहरामध्ये सध्या काही स्थानिक विक्रेत्यांकडून नामांकित कंपन्यांच्या नावाखाली बनावट आणि महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या कीटकनाशकांची खुलेआम विक्री केली जात आहे. विशेषतः ‘Syngenta’ कंपनीचे ‘Isabion’ हे बनावट कीटकनाशक मोठ्या प्रमाणावर विकले जात असल्याचे समोर आले आहे. नाशिक येथील कंपनीने पोलिसांच्या मदतीने सापळा रचून लोणारमधील विक्रेत्याकडून २९,००८ रुपयांचा बनावट मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस कारवाई झाली असली तरी, स्थानिक पातळीवर काही हितसंबंधी लोकांकडून या प्रकरणात तडजोड करून प्रकरण दडपण्याचे प्रयत्न सुरू असल्याची दाट शक्यता आहे. ही औषधे बनावट असल्याने पिकांवरील किडीचे नियंत्रण होत नाही, उलट पिके जळून जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान आणि मानसिक खच्चीकरण होत आहे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी लावून दोषी विक्रेते आणि त्यांच्यामागे असलेल्या मुख्य सूत्रधारांवर कठोर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.लोणार आणि परिसरातील कृषी सेवा केंद्रांची कृषी विभागाच्या भरारी पथकामार्फत आकस्मिक तपासणी करावी.हे प्रकरण कोणत्याही दबावाखाली दडपले जाणार नाही याची आपण वैयक्तिक रित्या दखल घ्यावी.बळीराजाला लुटणाऱ्या या माफियांवर कडक कारवाई करून बळीराजांना न्याय द्यावा. अशी मी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तहसीलदार लोणार यांच्या मार्फत कृषिमंत्री माननीय दत्तात्रय भरणे यांना निवेदन देऊन करण्यात आलीयाप्रसंगी शिवसेना विभाग जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छीरे यांच्या शहर प्रमुख गजानन जाधव, तालुका निवडणूक समन्वयक सुदन अंभोरे, शहर संघटक तानाजी मापारी, युवा शहर प्रमुख श्रीकांत मदनकर, अल्पसंख्यांचे इकबाल कुरेशी, अवेस कुरेशी अशपाक खान, यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
