मेरा बु येथे आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम पाटील महाराज यांचे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त जाहीर कीर्तन. जनतेच्या सहकार्यामुळेच मेरा बु चा विकास करण्याचे भाग्य लाभले .गजानन वायाळ.
चिखली( एकनाथ माळेकर )चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु येथे श्री संत गजानन महाराज प्रगट दिनाच्या निमित्त मेरा बु येथे महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे कीर्तन सोहळ्याचे आयोजन मेरा बु ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सर्वश्री सदस्य तथा गजानन वायाळ यांनी मेरा बु येथील जनतेची सेवा केली त्याबद्दल संकल्प पूर्ती सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मेरा बु येथे सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व गजानन वायाळ यांच्या मार्गदर्शनामध्ये अनेक कामे त्यांनी जो संकल्प केला होता त्याच्यानुसार जवळजवळ भरपूर कामे करण्यामध्ये गजानन वायाळ. सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांना यश आले आहे जे कामे बाकी आहे ते सुद्धा लवकरच जनतेच्या सहकार्यातून लवकरच पूर्ण करण्याचे हमी शरदचंद्र पवार पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वायाळ यांनी दिली आहे त्या निमित्त संकल्पपूर्ती सोहळा महाराष्ट्राचे आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार यांच्या कीर्तनाचे आयोजन केले आहे सदर किर्तन हे संस्कार मूल्याचा जागर करणारे असून भक्ती भावात पार पडणार आहे तरी परिसरातील भाविकांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा सदर किर्तन सोहळा हा 8 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी आठ वाजता मारुती मंदिर बाजार गल्ली रोड मेरा बु येथे संपन्न होणार आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी या कीर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आव्हान गजानन वायाळ.सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व मेरा बु ग्रामस्थ यांनी परिसरातील सर्व जनतेला आव्हान केले आहे
