UGC ची जातीभेदभाव विरोधी नियमावली कायम करा;अम्रपाल भाऊ वाघमारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन…
बुलढाणा ( बुलढाणा माझा न्युज )देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये होणारा जातीभेदभाव रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) लागू केलेली नवीन नियमावली केवळ कागदावर न राहता, तिचे कायद्यात रूपांतर करून तिची कायमस्वरूपी अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी आज भारतीय समता संघटनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निवेदन सादर करण्यात आले.उच्च शिक्षण संस्थांमध्ये वंचित आणि शोषित घटकांतील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सन्मानकारक वातावरण मिळावे, यासाठी UGC ने नुकतीच नवी नियमावली जाहीर केली आहे. या निर्णयाचे स्वागत करतानाच, त्याची अंमलबजावणी अधिक कठोरपणे व्हावी, अशी मागणी या निवेदनातून अम्रपाल भाऊ वाघमारे यांनी केली आहे .*निवेदनातील प्रमुख मागण्याः*कायदेशीर दर्जा: UGC च्या नियमावलीचे रूपांतर कडक कायद्यात करण्यात यावे.कठोर कारवाई: नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शिक्षण संस्थांवर फौजदारी कारवाईची तरतूद असावी.संवैधानिक अंमलबजावणीः संविधानातील कलम १४, १५ आणि १७ नुसार समता प्रस्थापित करण्यासाठी शिक्षण संस्थांमध्ये ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवावे.आत्महत्या रोखण्यासाठी उपायः शैक्षणिक क्षेत्रातील दुजाभावामुळे होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांना आळा घालण्यासाठी विशेष यंत्रणा उभी करावी.शिक्षण संस्था या समाजाला दिशा देणाऱ्या जागा आहेत. तिथे होणारा भेदभाव हा लोकशाहीसाठी घातक आहे. संविधानाच्या भावनेशी सुसंगत असलेल्या या नियमावलीची प्रभावी अंमलबजावणी झाल्यास अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला. आमोल भाऊ थोरात ,जय इंगळे ,विनोद जाधव पीके शेजोळ ,आमोल भाऊ इंगळे ,विशाल हीवरकर , इत्यादी हजर होते .
