मेरा बु महाराष्ट्रातील संकल्प पूर्ती सोहळा साजरी करणारी पहिली ग्रामपंचायत . पुरुषोत्तम महाराज पाटील. जनतेने सेवेची संधी दिल्यास संधीचे सोन करू गजानन वायाळ.

IMG-20260209-WA0005

बुलढाणा (एकनाथ माळेकर) चिखली तालुक्यातील मौजे मेरा बु गजानन महाराज प्रकट दिन व संकल्प पूर्ती सोहळ्याचे आयोजन राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वायाळ सरपंच उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मेरा बु यांच्या वतीने 8 फेब्रुवारी 2026 बाजार गल्ली मेरा बु येथे रोजी करण्यात आले होते त्यामध्ये महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार आवाजाचे जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील भुतेकर यांचे मेरा बु येथे आगमन होताच भव्य दिव्य असे फटाक्याचे आतिषबाजी करून स्वागत करण्यात आले त्यानंतर गजानन वायाळ व पुरुषोत्तम महाराज पाटील भुतेकर यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना हार घातला व राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला भेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हार घालून गावामधून मिरवणूक काढून कार्यक्रम स्थळी पोहोचले महाराष्ट्रातील आवाजाची जादूगार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी आपल्या कीर्तन रुपी सवेमधून सांगितले की महाराष्ट्रातील मेरा बु अशी पहिली ग्रामपंचायत आहे की त्यांनी आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर संकल्प पूर्ती सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे या अगोदर महाराष्ट्र मध्ये कुठेही असा सोहळा झाला नाही . मेरा बु हे चिखली तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे जवळजवळ 15000 लोकसंख्या असलेले मेरा बु गाव मध्ये तेरा ग्रामपंचायत सदस्य असणाऱ्या ग्राम पंचायत चा कारभार गेल्या पाच वर्षापासून व्यवस्थित चालू असून जनतेच्या विश्वासामुळेच अनेक कामे मेरा बु येथे करण्यात आले आहे त्यातच जी मेरा बु येथील मुख्य समस्या होती पिण्याच्या पाण्याची समस्या अनेक दिवसापासून होती ती पूर्णत्वास नेली आहे अनेक विकास कामे मेरा बु येथे करण्यात आली आहे हे सर्व ग्रामपंचायत सदस्य व मेरा बु ग्रामस्थ यांच्या सहकार्यामुळेच झाले आहे असे गौरव उदगार राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वायाळ यांनी सभेला संबोधित करताना काढले आहे आणि भविष्यात येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही आम्हाला सेवेची संधी दिल्यास विकासाची गंगा ही मेरा बु येथे आणल्याशिवाय राहणार नाही आसे गौरव उदगार राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उपजिल्हाप्रमुख गजानन वायाळ यांनी सभेला संबोधित करताना केले आहे परिसरातील हजारो लोकांनी या कीर्तन सेवेचा लाभ घेतला आहे या ठिकाणी मनुबाई गुंजाळ काटोडा कवठळ चंदनपुर अंत्रीखेडेकर असोला मेरा खुर्द दरेगाव परिसरातील सर्वच ग्रामस्थ यांनी कीर्तन सवेचा लाभ घेतला आहे

You may have missed

error: Content is protected !!