बिबी येथे संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा उत्साहात साजरा

IMG-20260209-WA0001

सिंदखेडराजा (अनिल दराडे) बीबी: येथे श्री संत गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त गजानन महाराज सांस्कृतिक आश्रम बहुउद्देशीय संस्था येथे ६ फेब्रुवारी पासुन उत्साहास सुरुवात झाला. ८ फेब्रुवारीला महाप्रसादाने सोहळ्याची सांगता झाली,बीबी येथे सालाबादप्रमाणे याहीवर्षी संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळा गुरुवर्य संत हभप रंगनाथ बाबा यांच्या आशीर्वादाने व ग्रामस्थांच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. यानिमित्त दररोज नामवंताचे प्रवचन, कीर्तन, भारुड, राष्ट्रीय एकात्मता, व्यसनमुक्ती जनजागृती, देश वाचवा लेक वाचवा’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संत गजानन महाराज मंदिरात होमहवनयज्ञ मूर्ती अभिषेक करण्यात आलाप्रकटदिनानिमित्त कीर्तन काकडा भजन, हरिपाठ, गजानन विजय ग्रंथाचे पारायण साठी ९१ महिला व पुरुष यांनी सहभाग घेतला होता , व गजानन महाराज चरित्र व सायंकाळी नामवंत महाराजांचे हरिकीर्तन होत . ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता गजानन महाराजांच्या प्रतिमेची रथातून नगरप्रदक्षिणा वारकऱ्यांच्या टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आले व नगरप्रदक्षिणेमध्ये माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब नगरप्रदक्षणेत वारकऱ्यांसोबत भजन व फुगडी खेळून आनंद घेतला नगर प्रदक्षिणेमध्ये हजारो वारकऱ्यांच्या संख्येने नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. यावेळी रथ पालखीचे पूजन ठाणेदार चंद्रकांत पाटील साहेब व अभयदादा चव्हाण सभापती राजु इंगळे बबन बनकर चंद्रकला गुलमोहर संदीप चव्हाण बबलू आटोळे सागर बनकर शाहीर चव्हाण शकुआप्पा बनकर राजु मुंढे दिलीप फडके यांनी केले.व नंतर काल्याचे कीर्तन सारंगधर महाराज टेके यांनी केले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी भाविक भक्त, महिला, पुरुष, बाळ गोपाळ यांनी हजारोच्या संख्येने महाप्रसादाचा आस्वाद घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थान विश्वस्त सारंगधर महाराज टेके रमेश कुरंगळ गोविंद टेके गोपाल महाराज टेके वैभव आंधळे गोटु आवगळे रमेश उबाळे समाधान नरवडे व समस्त गावकरी मंडळी बिबी व परिसरातील भाविक भक्तांच्या सहकार्याने संपन्न झाले

You may have missed

error: Content is protected !!