शेतकऱ्यांच्या शेतातील अफू,गांजा पकडण्यासाठी धडपडणारी पोलीस यंत्रणा अवैद्य वरली मटका आणि अवैध गुटखा विक्रीकडे लक्ष देणार का ? अंढेरा पुलिस स्टेशन हद्दीमध्ये सर्रास चालू असलेल्या गुटखा व वरली मटका संबंधित विभागाला दिसत नाही का? कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे लक्ष देणार का?
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी एकनाथ माळेकर) – देऊळगाव राजा तालुक्यातील आणि चिखली तालुक्यातील अनेक गावे असलेल्याअंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या अनेक गावात अवैध गुटखा विक्री वरली मटका सर्रास सुरू आहे अंढेरा पोलीस स्टेशन भागामध्ये सर्वाच भागात गुटकाविक्री जोमात चालू असताना विशेषतः अंढेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या खेडोपाडी मोटरसायकलद्वारे विक्री होत असलेल्या गुटखा विक्रीला आशीर्वाद कोणाचे असा प्रश्न सध्या नागरिकांमध्ये पडत आहे. राज्य शासनाने राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखूची विक्री साठवणूक व सेवनावर कडक बंदी घातलेली असतानाही चिखली तालुक्यात ग्रामीण भागात मोटरसायकल द्वारे गुटखा प्रत्येक दुकानात पोहोचविल्याचे काम होत असून ग्रामीण भागातील अनेक दुकान,पान टपरी व चहाच्या हॉटेल मधे गुटखा मिळून येत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.आरोग्यास अत्यंत घातक असलेले ह्या पदार्थाची विक्री रोखण्याची जबाबदारी असलेल्या अन्न व औषध प्रशासन स्थानिक पोलिसांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे गुटखा ग्रामीण भागातील खेडोपाडी आणून छोट्या मोटारसायकलचा वापर करून वितरित केला जातो ग्रामीण भागातील रस्ते लगत असलेल्या पान टपऱ्या, हॉटेल, दुकानवर खुलेआम विक्रीस ठेवलेले दिसून येत आहे. रस्तो रस्ती गुटखा पुड्याचे अवशेष व पिचकारी दिसून येत आहे,अशी अवस्था असताना सार्वजनिक स्वच्छतेचाही प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येतो,मात्र गुटख्यावर कारवाई करण्याचे अधिकार असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभाग गेंड्याची कातडी डोळ्यावर घेऊन गाढ झोपेत तर नाही ना?असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे.या अवैधरित्या चालू असलेल्या गुटक्यावर आळा घालण्यासाठी अन्नसुरक्षा व पुलिस विभागाने ग्रामीण भागात अधिक तीव्र छापेमारी करणे अवैध विक्री साखळी उद्वस्त करणे आणि स्थानिक प्रशासनाने कडक पावले उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे अंढेरा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुलेआम वरली मटक्याचा व्यवसाय सुरू आहे सर्वसामान्य जनतेला दिसतो परंतु ज्या यंत्रणेवर यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे त्याच यंत्रणेला वरली मटका दिसत नाही का संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात बंद असलेला वरली मटका अंढेरा पोलीस स्टेशन मध्येच कसा सुरू आहे याकडे जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे अवैद्य गुटखा विक्री व अवैद्य वरली मटका याचे भरपूर पुरावे बुलढाणा माझ्याकडे आहे शेतकऱ्याकडे करडी नजर ठेवणारे अवैद्य धंद्याकडे नजरे टाकू शकत नाही ही खूप मोठी शोकांतिका आहे असा संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेतून येत आहे जिल्हा पुलिस अधिक्षक निलेश तांबे यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही तूर्तास एवढेच बाकी पुढील भागात.
