थेट स्वतंत्रता स्मारकच अतिक्रमणाच्या पारतंत्र्यात……!बुलढाण्यातील एका व्यापाऱ्याची दादागिरी प्रशासनही भीतीग्रस्त.पंचनामा मोजणी केल्यास अधिकाऱ्यांवरच गुन्हे दाखल करण्याची लेखी धमकी.
बुलढाणा(निलेश कोल्हे )बुलढाण्यामध्ये थेट स्मारकावरच अतिक्रमण करून सदर स्मारक माझ्याच मालकीचे असल्याचा खळबळ जनक दावा. बुलढाण्यातील एका पेट्रोल पंप व्यापाऱ्याने केला आहे. तर थेट स्मारकावरच अतिक्रमण करून बोर्ड लावला या ठिकाणी कोणतेही स्मारक नाही. कोणीही येऊ नये,आमच्या ग्राहकांना त्रास होतो. असा फलक तिसऱ्यांदा लावला आहे. यापूर्वी लावलेला फलक संबंधित प्रशासनाने काढून त्या ठिकाणी क्रांतिकारकांना अभिवादन आणि नेताजी जयंती उत्सवाला सलग ३३ व्या वर्षी रीतसर परवानगी सुद्धा दिलेली आहे. परंतु जयंती संपल्यानंतर लगेच सदर पेट्रोल पंप मालकाने त्या ठिकाणी पुन्हा बोर्ड लावून जनसामान्यांना येण्यास मज्जाव केला आहे. यावर आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला काय देशील नोटीस तथा निवेदन देत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलेली आहे. त्यानुसार संबंधित जिल्हा प्रशासनाने वारंवार स्थळ पंचनामा, मोजणी करण्यासाठी अधिकारी पाठवले. परंतु संबंधित व्यापारी उपस्थित न राहत नाही.मोजणी करण्यास हरकत घेऊन अधिकाऱ्यांना दमदाटी करतोय. अधिकाऱ्यांवरच वेगवेगळ्या कलमान्वये कारवाई करण्याची लेखी नोटीस देतो. त्यामधील वेगवेगळ्या कलमांमध्ये अधिका-यांवर कोणती कारवाई करान्याची धमकी दिली हे आश्चर्य जनकच आहे.त्यामुळे संपूर्ण जिल्हा प्रशासन भीतीग्रस्त आहे. त्यामुळेच अद्यापही एकाही अधिकाऱ्याने सदर फलक काढण्याचे सूचना सदर पेट्रोल पंप मालकाला अद्याप रितसर दिलेले नाही.तर नियमानुसार कारवाई न झाल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा अँड रोठेंनी दिला आहे.काय आहे पार्श्वभूमी आणि भारतीय स्वतंत्रता स्मारक..!बुलढाणातील जयस्तंभ चौकालगत असलेल्या पेट्रोल पंपाला 2008 मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार 456 चौ.मी.जागा 16 कलमी नियम व अटी लागू करून दिलेली आहे. त्यामधील बहुतांश अटींचा भंग संबंधित पेट्रोल पंप मालकाने 2012 पासून आज पर्यंत सातत्याने केला आहे. वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई सुद्धा झालेली आहे. असे असताना आजही सदर स्मारक व्यापाराच्या अतिक्रमण आणि फलकाने पुन्हा पातंत्रात गेले आहे.बुलढाणा शहरानजीक, जयस्तंभ चौकाजवळील एका पेट्रोल पंपाला लागून भारतीय स्वतंत्रता स्मारक अक्षय वटवृक्ष आहे. सदर स्मारकाची स्थापना १४ ऑगस्ट १९४७ झाली आहे. स्मारकावरील शिलालेखांमध्ये प्रक्षय वट, श्रावण वद्य १४ विक्रमाद्ब २००४ तत्कालीन भाषेमध्ये लिहिलेला शिलालेख स्पष्ट दिसत आहे. शिलालेख म्हणजे स्वतंत्र भारताच्या प्रथम ध्वजारोहणाचे केंद्रबिंदूही आहे. याच ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 रोजी तत्कालीन मध्य प्रदेशचे विधानसभा सभापती सि.डी. गुप्ता, नगरपरिषद नगराध्यक्ष डी.सी गुप्ता तत्कालीन स्वातंत्र्य सेनानी आत्माराम पांडे, पंडित कानडे शास्त्री व इतर प्रशासकीय अधिकारी, क्रांतिकारकांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सदर ऐतिहासिक ध्वजारोहणाचे तत्कालीन दस्त, फोटोग्राफ अद्यापही बुलढाणेकरांकडे उपलब्ध आहे. परंतु प्रशासकीय दस्तऐवजावरून ते महत्वपूर्ण दस्त गहाळ झाले किंवा चोरून गेलेले असावे. अशी परिस्थिती सद्यस्थितीत निर्माण झाली आहे. परंतु अद्यापही सदर स्मारक अतिक्रमणाच्या विळख्यात असून एकाही अधिकाऱ्याने त्यावरील अतिक्रमण आणि फलक काढण्याचे निर्देश साधी सूचना काढण्याची हिंमत केली नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून काही विशेष अधिकाऱ्यांना चौकशीचे निर्देश दिलेले असल्याची माहिती तक्रारदारांना प्राप्त झाली आहे.
