मेहकर तालुक्यातील आज 98 ग्रामपंचायत सरपंच पदाची आरक्षण; सोडत….

Oplus_16777216

Oplus_16777216

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) : ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार, मेहकर तालुक्यातील एकूण 98 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या व मुंबई ग्रामपंचायत (सरपंच व उपसरपंच) निवडणूक नियमामधील तरतुदींनुसार हा कार्यक्रम पार पाडण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत सन 2025 ते 2030 या कालावधीत सार्वत्रिक निवडणुकांद्वारे गठीत होणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नारिकांचा मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण सोडत दि 8 जुलै रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय, मेहकर येथे निश्चित होणार आहे. सदर आरक्षण सोडतीकरीता मेहकर तालुक्यातील सर्व लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी, तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मेहकर तहसीलदार निलेश मडके यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!