पंढरपूर वरून येणाऱ्या वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; ३० वारकरी जखमी….

Oplus_16777216

Oplus_16777216

चिखली ( एकनाथ माळेकर )राज्यात एसटी महामंडळाच्या बसला होणाऱ्या अपघाताच्या घटना वाढताना दिसत आहे. अशातच पंढरपूर येथे देवदर्शन करुन घराकडे परतत असताना एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना बुलढाण्यात चिखलीजवळ घडली. या अपघातामध्ये ३० वारकरी जखमी झाले. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नसून जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी वारीनिमित्त विठूरायाचे दर्शन घेऊन घराकडे परत निघालेल्या वारकऱ्यांच्या बसला भीषण अपघात झाला. ही एसटी बस पंढरपूरवरून खामगावच्या दिशेने जात होती. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बस चिखली शहराजवळ पोहोचली तेव्हा बसला अपघात झाला. बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट डिव्हायडरला धडकली. त्यानंतर बस उलटली.
या एसटी बसमध्ये एकूण 51 भाविक आणि चालक तसेच वाहक असे एकूण 53 जण होते.

या अपघातामध्ये ३० वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातामध्ये जीवितहानी झाली नाही. या अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तात्काळ मदत करत वारकऱ्यांना उपचारासाठी दाखल केलं. जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी चिखली आणि बुलडाणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!