अंचलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर’ उत्साहात संपन्न; नागरिकांना थेट लाभांचा वर्षाव!
सिंदखेड राजा (अनिल दराडे) राजस्व मंडळ सिंदखेड राजा अंतर्गत मौजे अंचली येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान शिबिर २०२६ मंगळवार दि. १२ फेब्रुवारी रोजी यशस्वीरीत्या पार पडले. माननीय जिल्हाधिकारी श्री किरण पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच उपविभागीय अधिकारी श्री संजय खडसे आणि तहसीलदार श्री अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले.शिबिराच्या अध्यक्षस्थानी सरपंच श्रीमती वनिता सोळंके होत्या. प्रमुख उपस्थितीत नायब तहसीलदार श्रीमती प्रांजल पवार यांच्यासह विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या शिबिरात नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या महसूल व सामाजिक योजनांशी संबंधित कामांना गती देण्यात आली. यामध्ये वारस नोंदी, निराधार अनुदान योजनेचे पूर्णत्व प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, उत्पन्न दाखले तसेच रेशन कार्डांचे लाभार्थ्यांना थेट वितरण करण्यात आले. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.तहसील कार्यालय सिंदखेड राजा अंतर्गत विविध विभागांचे प्रतिनिधी म्हणून श्री नागरे, श्रीमती रोकडे, श्रीमती बारवाल, श्रीमती पडघान, श्रीमती चिपडे, श्रीमती वाघ, श्रीमती जायभाये उपस्थित होते. आरोग्य विभागातून श्री प्रवीण शिंदे, कृषी विभागातून श्री रमेश झोरे तर सेतु केंद्राचे वानखेडे मॅडम, मयूर देशमुख, प्रमोद सोळंके, सतीश सोळंके यांनी सेवा बजावली.शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळ अधिकारी श्री सुनील टेकाळे, ग्राम महसूल अधिकारी जी. वाय. दराडे, एम. ए. उदार, के. एल. खरात, ओ. ए. गव्हाणकर, राहुल देशमुख, संगीता निकस तसेच महसूल सेवक पांडुरंग सुरुशे, संतोष पवार, शरद दराडे यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन सुरेश लिहीणार व डोंगरसिंग मेहेर यांनी केले.
