बुलढाणा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आणखी दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय ‘NQAS’ मानांकन…..

Screenshot_2026-02-15-13-10-39-25_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा( बुलढाणा माझा न्युज ) आरोग्य सेवेतील गुणवत्तेच्या जोरावर बुलढाणा जिल्ह्याने राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपली मोहोर उमटवली आहे. जिल्ह्यातील हतेडी (ता. बुलढाणा) आणि पिंपळगाव काळे (ता. जळगाव जामोद) या दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता प्रमाणपत्र (NQAS) प्राप्त झाले आहे. या यशामुळे आता जिल्ह्यातील एकूण पाच प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय स्तरावर मानांकित झाली आहेत. या मानांकनामुळे संबंधित दोन्ही आरोग्य केंद्रांना पुढील तीन वर्षांसाठी दरवर्षी ३ लाख रुपये याप्रमाणे एकूण ९ लाख रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. या निधीचा विनियोग रुग्णांच्या सोयी-सुविधा वाढवण्यासाठी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केला जाणार आहे.केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्ह्याचा राष्ट्रीय मानांकनात समावेश व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांनी सातत्याने आढावा बैठका घेऊन या कामाला गती दिली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिती यांच्या नेतृत्वाखालील आरोग्य पथकाने केलेल्या सूक्ष्म नियोजनामुळे हे यश साध्य झाले आहे.यापूर्वी जिल्ह्यातील किन्होळा, गणेशपूर व जानेफळ या तीन केंद्रांना हे मानांकन मिळाले होते. आता हतेडीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण जंजाळ आणि पिंपळगाव काळे येथील डॉ. कैलास काळे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण टीमचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.”भविष्यातही ग्रामीण भागातील जनतेला गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्यावर आमचा भर राहील. आरोग्य विभाग, आशा सेविका आणि सर्व कर्मचाऱ्यांच्या समन्वयामुळेच हे शक्य झाले आहे.”- डॉ. अमोल गिती, जिल्हा आरोग्य अधिकारी, बुलढाणा.

You may have missed

error: Content is protected !!