धक्कादायक: चिखलीत १२ वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्याने नराधमाचे कृत्य उघड…

7

चिखली ( बुलढाणा माझा न्युज ) चिखली तालुक्यातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणाऱ्या तरुणाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या नराधमाच्या कृत्यामुळे पीडित मुलगी गर्भवती राहिली असून, याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
सविस्तर वृत्त अशी की आरोपी सागर शेषराव सुरडकर (वय २२ वर्षे) याने गेल्या अनेक महिन्यांपासून पीडितेच्या अगतिकतेचा फायदा घेतला. १५ जून २०२५ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत, जेव्हा पीडित मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
काही दिवसांपासून पीडित मुलीला पोटदुखीचा तीव्र त्रास होऊ लागला. मुलीची प्रकृती खालावल्याने तिच्या आईने तिला तातडीने दवाखान्यात नेले. मात्र, वैद्यकीय तपासणी दरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, पीडितेने घडलेला सर्व आपबिती कथन केली.
मुलीने दिलेल्या माहितीनंतर, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी चिखली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ कारवाई करत खालील कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.भारतीय न्याय संहिता गंभीर स्वरूपाच्या अत्याचाराची कलमे.
​पॉक्सो कायदा बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल.
पोलिसांनी आरोपी सागर सुरडकर याला अटक केली असून त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चिखली शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे करत आहेत.

You may have missed

error: Content is protected !!