बुलढाणा हादरले! दोन जिवलग मित्रांची लागोपाठ आत्महत्या; ८ वीत शिकणाऱ्या मुलांच्या टोकाच्या पाऊलाने शहर सुन्न

Screenshot_2026-02-15-12-15-41-25_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

बुलढाणा (बुलढाणा माझा न्युज ) बुलढाणा शहरात अवघ्या चार दिवसांच्या अंतराने आठव्या इयत्तेत शिकणाऱ्या दोन जिवलग मित्रांनी जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच नामांकित विद्यालयात शिकणाऱ्या या दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या टोकाच्या पावलामुळे शैक्षणिक वर्तुळात आणि पालकवर्गात प्रचंड दहशतीचे व चिंतेचे वातावरण पसरले आहे. सविस्तर वृत्त असे की पहिली घटना ११ फेब्रुवारी (बुधवार) रोजी घडली. छत्रपती नगर येथील एका १४ वर्षीय विद्यार्थ्याने आपले आई-वडील (जे शिक्षक आहेत) कामाानिमित्त बाहेर गेलेले असताना घरात गळफास घेतला. या घटनेचा धक्का ओसरतो न ओसरतो तोच, १५ फेब्रुवारी (शनिवार) रोजी मृत विद्यार्थ्याच्या वर्गमित्रानेही सुंदरखेड परिसरातील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. दुसरा मृत विद्यार्थी हा पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा होता.दोन्ही मुले एकाच वर्गातील होती आणि त्यांच्यात चांगली मैत्री होती. पहिल्या मित्राच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने दुसऱ्याने हे पाऊल उचलले की यामागे काही वेगळेच गूढ दडले आहे, याबाबत शहरात तर्कवितर्क लावले जात आहेत.

You may have missed

error: Content is protected !!