श्रीक्षेत्र केशव शिवनी येथे भक्तीचा ओघ; शंभू महादेवाचा शाही महाभिषेक संपन्नवेदमंत्रांच्या जयघोषात ब्रह्ममुहूर्तावर जलाभिषेक….
केशव शिवनी ( बुलढाणा माझा न्युज ) महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र केशव शिवनी येथील प्रसिद्ध शंभू महादेव मंदिरात भक्तीचा अथांग सागर लोटला आहे. आज पहाटे ब्रह्ममुहूर्तावर श्री मुर्डेश्वर संस्थान व श्री केशवराज संस्थानच्या अध्यक्षांच्या हस्ते सपत्नीक ‘महाभिषेक’ सोहळा अत्यंत थाटामाटात संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित सात दिवसीय धार्मिक महोत्सवाने संपूर्ण परिसर शिवमय झाला आहे.सोमवारी पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या. श्री शिवहरी देशपांडे यांच्या मंत्रोच्चाराने मंदिराचा परिसर भक्तीमय झाला होता. महाभिषेकानंतर देवाला फळांचा व पेढ्यांचा शाही नैवेद्य अर्पण करण्यात आला. यावेळी ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने पंचक्रोशी दुमदुमून गेली.या सोहळ्याला माजी सरपंच भगवानरावजी सानप, सरपंच विकासभाऊ आंधळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बबनरावजी सानप, रामेश्वरजी खार्डे, प्रकाश शेरे सर, मधुकर शेरे पाटील, संस्थानचे पुजारी दादारावजी महाराज, भागवतकार ह.भ.प. संतोषजी महाराज खडसे, गोपाल महाराज सानप यांच्यासह गावातील प्रतिष्ठीत नागरिक आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाला महिला भाविकांची उपस्थिती लक्षणीय होती. यामध्ये ह.भ.प. सरस्वतीबाई, सौ. पुष्पाताई शेरे, सौ. अनिताताई उदावंत, सौ. यमुनाबाई सानप, डॉ. सौ. पुजाताई शेरे, सौ. मीनाताई शेरे, स्वातीताई गीते यांच्यासह अनेक महिलांनी दर्शनाचा लाभ घेत पूजेमध्ये सहभाग नोंदवला.
