बुलढाणा नगरपालिका हद्दवाढ विरोधात पीडित गावांच्या आजी-माजी लोकप्रतिनिधींची संयुक्त निष्पक्ष, निर्भीड बैठक संपन्न!
बुलढाणा:- नगरपरिषद हद्द वाढ प्रस्ताव विरोधात सागवन, सुंदरखेड, येळगाव, माळविहीर येथील आजी माजी लोकप्रतिनिधींनी एकत्र येत आगामी काळातील निष्पक्ष, निर्भीड संघर्षावर सांगोपांग चर्चा करण्यात आली.चर्चेअंती सदरचा नगर पालिका हद्दवाढ प्रस्ताव हा आपल्या गावांवर अन्याय करणारा असून हा प्रस्ताव शासनाने त्वरीत रद्द करावा. गाव बचाव कृती समितीच्या माध्यमातून शासन स्तरावर प्रयत्न करावेत आणि त्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून मंगळवार दिनांक १७/२/२०२६ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांना भव्य गांवकरी जनआक्रोश मूक मोर्चा काढून निवेदन देण्याबाबत निर्णय करण्यात आला.आणि सदर गावांच्या सार्वभौमत्वाच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या जुलमी प्रस्ताव जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत संघर्ष कायम ठेवण्याचे ठरले.यावेळी सागवन, सुंदरखेड, माळविहिर, येळगाव येथून आलेल्या प्रमुख आजी, माजी लोकप्रतिनिधींनी आपापली मते मांडून गावं हिताच्या बाजूने उभे राहण्याचा संकल्प केला.
