खामगाव पोलिसांची मोठी कारवाई: २७ गुन्ह्यांत हवा असलेला सराईत घरफोड्या जालन्यातून जेरबंद; ८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

Screenshot_2026-02-16-13-13-33-78_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

खामगाव (बुलढाणा माझा):शहरातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यात खामगाव शहर पोलिसांना मोठे यश आले असून, २७ गुन्ह्यांमध्ये पाहिजे असलेल्या एका सराईत गुन्हेगाराला जालन्यातून अटक करण्यात आली आहे. या कारवाईत पोलिसांनी ८ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक आलिशान स्कोडा कार जप्त केली आहे.खामगाव आणि शेगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत बंद घरांचे कुलूप तोडून चोरी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. (खामगाव शहर अ.नं. B49/2026 व शेगाव शहर अ.नं. 82/2026). फिर्यादी बाहेरगावी गेलेले असताना, अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले होते.पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड व श्री. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक श्री. सुनील अंबुलकर यांनी तपासासाठी विशेष पथक तयार केले. सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी हे जालना येथील असल्याचे निष्पन्न झाले.​पोलिसांनी जालना येथील ‘गुरु गोविंद नगर’ परिसरात सापळा रचून संजय सिंग कृष्णा सिंग भादा (वय ३०) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याचा साथीदार विजयसिंग कृष्णा सिंग भादा (वय ४५) हा सध्या फरार आहे.पोलिसांनी आरोपीकडून खालील मुद्देमाल हस्तगत केला आहे:​३० ग्रॅम सोन्याचे दागिने: किंमत ४,५०,०००/- रुपये.​स्कोडा फोर व्हीलर: किंमत २,५०,०००/- रुपये.​मोबाईल: किंमत २०,०००/- रुपये.(एकूण ८,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.)​या धडाकेबाज कारवाईत खामगाव शहर पोलीस स्टेशनचे Psi पंकज सपकाळे, Hc एजाज खान, Pc अमोल शेजोल, Pc विक्रांत इंगळे, Pc अजिस परसूवाले तसेच Api विकास पाटील, Hc भीमराव वानखेडे, Pc गणेश कोल्हे, Pc अंकुश गुरुदेव, Pc राहुल थारकर, Pc ऋषी खंडेराव आणि चालक शिवानंद हेलगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.​अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी खामगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!