रूम्हना येथे समाधान शिबिर संपन्न ..
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हना इथे कै, तुकाराम कायदे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रमाणात, महसूल विभागाकडून राजस्व अभियानांतर्गत, समाधान शिबीर संपन्न झाली, सदर शिबिराचे अध्यक्ष तथा मार्गदर्शक म्हणून मंडळ अधिकारी जी.एन., तर दुसर बीड मंडळातील, ग्राम महसूल अधिकारी आर आर लांडगे, एस आर नागरे, जी एम पवार, व्ही जे. जायभाये, सुधाकर नागरे, वाघ, संजय सोनवणे, ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते, दीपक गवई, बद्री जाधव, रवींद्र खरात, हरिभाऊ जायभाये, यांच्यासह शेतकरी, प्रदीप जायभाये, दत्तात्रय जायभाये, अंबादास जायभाये, अशोक जायभाये, किंवा आनंद खेडकर, बाबासाहेब कायंदे, गणेश कायंदे, ज्यांच्या सह सोयंदेव, खैरखेड, देवखेड, तांदूळवाडी, रूम्हना, येथील शेतकरी हजर होते, यावेळी प्रामुख्याने, अतिवृष्टीच्या अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला, यावेळी मंडळ अधिकारी हे समर्पक उत्तर देऊ शकले नाही, त्यांनी सांगितले की, अनुदानापासून कुणीही वंचित राहणार नाही, तहसील कार्यालयात चौकशी करून शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात येईल, त्याचप्रमाणे पांदण रस्त्याबाबत शेतकऱ्यांनी अडीअडचणी समजावून घेतल्या, सदर शिबिराचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांनी केले
