किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी! ग्रामीण भागात शहराच्या दर्जाचे शिक्षण देण्याचा आमचा मानस: प्राचार्य जया जोशी

Screenshot_2026-02-19-17-26-56-72_99c04817c0de5652397fc8b56c3b3817

सिंदखेडराजा अनिल दराडे [, दि. १९ फेब्रुवारी:येथील किंडर गार्डन प्री-स्कूलमध्ये आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी चिमुकल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे, नृत्य आणि शिवरायांच्या घोषणांनी संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे संस्थापक अशोक जोशी आणि उपसरपंच नकुल शिंगणे इतर प्रमुख उपस्थिती यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी अमोल शिंगणे (ग्रामसेवक), महेश शिंगणे (ऑपरेटर), सचिन शिंगणे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष), संदीप शिंगणे (सामाजिक कार्यकर्ते), शुभम शिंगणे (तंटामुक्ती अध्यक्ष), विशाल शिंगणे (मार्केटिंग फेडरेशन सुपरवायझर), राजेंद्र देशमुख आणि प्रसाद शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेच्या शिक्षिका प्रिया फुटाणकर, निकिता शिंगणे, श्रद्धा मोरे आणि अंकिता फुटाणकर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. *शिवरायांचे कार्य आणि शाळेची भूमिका* कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य जया जोशी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टपैलू कार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, “शिवरायांनी शून्यातून विश्व निर्माण केले. त्यांनी केवळ गड-किल्ले जिंकले नाहीत, तर रयतेचे मन जिंकून ‘स्वराज्य’ स्थापन केले. स्त्रियांचा सन्मान, शेतकऱ्यांची काळजी आणि सर्वधर्मसमभावाची शिकवण हे त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी आहेत. त्यांच्या याच मूल्यांची रुजवणूक आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये करत आहोत.”शाळेच्या ध्येयाबद्दल बोलताना त्या पुढे म्हणाल्या, “गरीबातील गरीब विद्यार्थ्यांना शहराप्रमाणे उच्च दर्जाचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने ही शाळा ग्रामीण भागात सुरू केली आहे. ‘नफा नाही, तोटा नाही’ या तत्त्वावर आम्ही काम करत असून, वाढती विद्यार्थी संख्या हीच आमच्या कामाची पावती आहे.”विद्यार्थ्यांचे कलागुण आणि विशेष सत्कारशाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली, पोवाडे गायले आणि विविध नृत्ये सादर करून उपस्थितांची मने जिंकली. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे खास आकर्षण म्हणजे ‘छोटा फोटोग्राफर’ प्रसाद शिंगणे याने आपल्या कलेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या या कौतुकास्पद कार्याची दखल घेत मान्यवरांच्या हस्ते त्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृतिचिन्ह देऊन विशेष सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी, उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा शाल, श्रीफळ, फेटा आणि शिवरायांचे स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. पाहुण्यांच्या चहापानानंतर प्राचार्य जया जोशी यांनी आभार प्रदर्शन केले आणि कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्याला पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!