शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा येथे शिवजयंती उत्साहात साजरी
बुलढाणा:-नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बुलढाणा या संस्थेत दिनांक 19 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयाच्या व्याख्यान कक्षामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. त्यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रथम व द्वितीय वर्ष एमबीबीएस चे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम नृत्य करत तसेच शिवरायांचा जयघोष करीत संपूर्ण परिसर शिवमय केला होता. त्यानंतर महाविद्यालयाच्या व्याख्यान कक्षात छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन दीप प्रज्वलन कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुनील विधाते यांच्या हस्ते करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना राजू काटोले यांनी शिवचरित्र आणि आजची युवा पिढी या विषयावर विचार मांडले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवरायांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा कसा कोथळा बाहेर काढला याचा जिवंत देखावा तसेच पावनखिंडीत झालेली लढाई पोवाड्याच्या माध्यमातून प्रथम व द्वितीय वर्ष एमबीबीएस गजानन शिंदे, गौरव चौधरी, पियुष राठोड, साक्षी पाटील, नीलिमा गावड आदींनी सादर केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. सुनील विधाते हे होते. अध्यक्षीय भाषणात डॉ. विधाते यांनी छत्रपती शिवाजी महाराजावर विचार मांडले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छत्रपती शिवरायांचे विचार, दूरदृष्टी आत्मसात केल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवणे सोपे होईल असे प्रतिपादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागृती रहांगडाले तसेच साहिल सोनवणे या एमबीबीएस विद्यार्थ्यांनी केले. यावेळी डॉ .अजित शिरसाठ,डॉ. सागर फाटे, डॉ. अर्चना टेकाळे, डॉ.श्रेया बढे, डॉ. सुबोध पाटील, महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी श्री सोमनाथ माठे, महेश राखे, प्रमोद भोपळे यांच्यासह प्रथम व द्वितीय वर्ष एमबीबीएस चे विद्यार्थी तसेच सर्व स्टाफ, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एमबीबीएस प्रथम वर्ष विद्यार्थी अभिजीत नरोटे,श्रीओम धात्रक,आदित्य करपे, आयुषी पटेल, संचिता गावंडे, प्रतिमा पवार, श्रद्धा दसरे, रीशील जांभुळकर, गजानन शिंदे आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
