सदिप शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

IMG-20260219-WA0074

सिंदखेडराजा( रवी ढवळे)येथे राजश्री शाहू मल्टीटेस्ट बँक यांच्या वतीने संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.हे रक्तदान शिबिर राजमाता जिजाऊ राजवाडा समोर उत्साहात पार पडले. या शिबिरात सुमारे 30 ते 35 जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. तरुणांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत रक्तदान हे श्रेष्ठदान असल्याचा संदेश दिला.रक्तदान शिबिरात रक्तदात्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक वैद्यकीय सुविधा व सुरक्षिततेची पूर्ण व्यवस्था करण्यात आली होती. आयोजकांच्या वतीने सर्व रक्तदात्यांचे स्वागत करून त्यांचे आभार मानण्यात आले.संदीप दादा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून, या कार्यक्रमास बँकेचे पदाधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!