राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळेत शिवजयंतीनिमित्त सामूहिक मानवंदना….

IMG-20260219-WA0076

सिंदखेडराजा (रवी ढवळे)येथील राजे लखोजीराव जाधव उच्च प्राथमिक शाळा परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विधिवत वंदन करण्यात आले. कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच नर्सरीच्या मुख्याध्यापिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे शौर्य, स्वराज्याची संकल्पना व आदर्श विचारांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व देशभक्तीची भावना रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

You may have missed

error: Content is protected !!