शाम राऊत यांची लोणार काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड…
लोणार (यासीन शेख ) : लोणार नगरपालिकेचे माजी नगरसेवक श्याम पूजाजी राऊत यांची लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या उपाध्यक्षपदी निवड ही नियुक्ती मल्लिकार्जुन खरगे व सोनीया गांधी, लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी काँग्रेस कमिटीचे महासचिव मुकूल वासनिक यांच्या मान्यतेने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्याआदेशानुसार व बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दिनांक 17 फेब्रुवारी 2026 रोज मंगळवार दुपारी 3:00 वाजता लोणार येथील कमळजा माता पेट्रोल पंप च्या कार्यालयात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष लक्ष्मण दादा घुमरे, यांच्या हस्ते लोणार तालुका काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष आश्रुजी फुके यांनी व लोणार नगरपालिकेचे मा.नगराध्यक्ष भूषण मापारी, लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी लोणार नगरपालिकेचे आरोग्य सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, माजी नगरसेवक संतोष मापारी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दौलत मानकर, बंडू सांगळे, प्राध्यापक भानुसे सर, भवानी मापारी उपस्थित होते. यावेळी लक्ष्मण दादा घुमरे यांनी तळागाळातील कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष संघटना वाढवण्याचे काम आपण या माध्यमातून करावे आपल्या पदास योग्य न्याय देवून पक्ष संघटना वाढीवसाठी व बळकटीकरणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे सांगत शुभेच्छा दिल्या.*पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला व लोणार तालुका उपाध्यक्ष पदाची जिम्मेदारी दिली ती मी इमानदारी पूर्व पार पाडेल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी जीवाचे रान करून पक्षाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणू व पक्ष संघटना वाढवण्यासाठी प्रयत्न करीन – शाम राऊत*
