राज्यस्तरीय संपामुळे भूमि अभिलेख विभागाचे कामकाज ठप्प! भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना दिले निवेदन भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा येथील सर्व कर्मचारी संपात सहभागी
सिंदखेडराजा( अनिल दराडे) भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्रातील सर्व भूमि अभिलेख विभागातील कर्मचारी संपावर गेले आहेत, त्यामुळे या संपाचा महाराष्ट्रातील भूमि अभिलेख विभागाशी संबंधित कामावर मोठ्या प्रमाणात प्रभाव पडल्याचे दिसून येत आहे . भूमि अभिलेख च्या इतिहासात राज्यातील सर्व भूमि अभिलेख चे कर्मचारी भूमी अभिलेख कर्मचारी कृती समिती महाराष्ट्र राज्य च्या एकाच छताखाली आले असून यातून कर्मचाऱ्यांची ताकद एकटवल्याचे दिसून येत आहे. भूमी अभिलेख विभागातील भूकरमापक हे विभागाचे कणा मानले जातात. जमिनीची मोजणी करण्यापासून ते शासकीय दस्तऐवज अद्ययावत ठेवण्यापर्यंत त्यांची कामे अत्यंत तांत्रिक आणि महत्त्वाची असतात.कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची रूपरेषा जाहीर केली असून ती पुढीलप्रमाणे, १८ फेब्रुवारी 2026 रोजी मोजणी साहित्य कार्यालयात जमा करून काळ्या फिती लावून कामकाज करणार आहेत, २० फेब्रुवारी 2026 पासून मोजणी काम बंद २३ ते २६ फेब्रुवारीदरम्यान सामूहिक रजा २७ फेब्रुवारी रोजी पुण्यात जमाबंदी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे .मागण्या मान्य न झाल्यास २ मार्चपासून संपूर्ण राज्यात बेमुदत संप पुकारण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.आज निवेदन देताना भूमि अभिलेख कार्यालय देऊळगाव राजा येथील मुख्यालय सहायक राहुल खेडकर, शिरस्तेदार हेमंत देशपांडे, शिरस्तेदार वसंत सानप, निमतनदार प्रसाद पांडे, भुकरमापक रमेश शिंदे, राजेंद्र गहेराव, योगेश कांबळे, शशिकांत इंगळे, अनिकेत राठी, श्रीमती ज्योती इंगळे इत्यादी उपस्थित होते.
