शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजिवनी वाघ यांना मारहाण चिखला काकड गावात तणावसगळ संपलं ! उद्या सकाळी आत्महत्या करते – संजीवनी वाघ यांचा स्टेटस

Screenshot_2026-02-20-22-52-25-06_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

लोणार (यासीनशेख) तालुक्यातील चिखला काकड उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांना गावातीलच काही जणांनी बेदम मारहाण केल्याने गावात तणाव निर्माण झाला आहे. अंगावरील कपडे फाडले असा आरोप संजीवनी वाघ यांनी केला असून तसे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या एक दिवस आधीच गावामध्ये खुल्या जागेवर अज्ञातांनी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. मात्र, हा पुतळा बसवल्यानंतर गावातील लग्न समारंभ करण्याकरता जागा उरणार नसल्याने हा पुतळा ग्रामपंचायतीमध्ये उभारावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली होती.सध्या गावात प्रचंड तणाव असून पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. दरम्यान आपल सगळं संपलं, आता उद्या सकाळी ७ वाजता मी आत्महत्या करणार आहे असे व्हॉटस् अप स्टेटस संजीवनी वाघ यांनी ठेवले आहे.

You may have missed

error: Content is protected !!