शिवरायांच्या विचारांचा जागर: स्किल पॅरामेडिकल कॉलेज,बुलढाणा मध्ये भव्य शिवजयंती उत्सव

IMG-20260221-WA0047

बुलढाणा : स्किल पॅरामेडिकल कॉलेज,बुलढाणा येथेछत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२६ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात, भक्तीभावाने व राजेशाही थाटामाटात साजरी करण्यात आली. महाविद्यालय परिसर भगव्या पताका, आकर्षक सजावट व शिवचरित्र दर्शविणाऱ्या फलकांनी सजविण्यात आला होता.कार्यक्रमाची सुरुवात मा. प्राचार्या प्रा. सौ. चैताली पाटील मॅडम यांच्या हस्ते शिवप्रतिमेच्या पूजन व माल्यार्पणाने करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संजय सोनुने सर (स्किल अक्यूपंक्चर कॉलेज बुलढाणा) उपस्थित होते.प्रमुख पाहुण्यांनी आपल्या भाषणातून शिवाजी महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य व स्वराज्याची संकल्पना विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडली. तसेच मा. प्राचार्या प्रा. सौ. चैताली पाटील मॅडम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून शिवाजी महाराजांच्या आदर्श नेतृत्वगुणांवर, शिस्तप्रियतेवर, स्त्रीसन्मानाच्या भूमिकेवर व राष्ट्रप्रेमाच्या विचारांवर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे तर चारित्र्यसंपन्न व समाजाभिमुख नागरिक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रा. उमेश सावळे, प्रा. सौ. कोमल लटके, प्रा. सौ. प्रियांका काकडे, प्रा. अभिषेक पाटील, प्रा. शुभम सुरडकर, प्रा. प्रतिभा जाधव,कु. शिल्पा जाधव, सौ. सोनाली गवई,कु. मेघा सुनगत,श्री. दिगंबर खंडागळे व सौ. लक्ष्मी ढोके यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित मनोगते, पोवाडा, देशभक्तीपर गीत व सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. “जय भवानी, जय शिवाजी”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन AD.DMLT च्या विद्यार्थिनी रेणुका भाकरे व साक्षी खेडेकर यांनी प्रभावीपणे केले. कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन प्रा. सौ. प्रियांका काकडे यांनी केले कार्यक्रमाच्या शेवटी DMLT 2nd Year च्या विद्यार्थिनी प्रीती माकोने यांनी आभारप्रदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

You may have missed

error: Content is protected !!