चिखला काकड प्रकरणी सत्य बाहेर आणा निरपराधांवर कारवाई थांबवा – तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई

Screenshot_2026-02-22-21-22-52-63_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

लोणार:- चिखला काकड येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रकरणाचा निष्पक्ष व सखोल तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, तसेच निरपराध नागरिकांवर होणारी कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी दिलेल्या प्रसिद्धी द्वारे केली आहे. घटनेचा निषेध व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, ज्या व्यक्तींचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, त्यांनाही विनाकारण गोवले जात असल्याची माहिती समोर येत आहे. केवळ राजकीय हेतूने काही विशिष्ट लोकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोपही त्यांनी केला. अशा प्रकारे वातावरण तापवून समाजात तणाव निर्माण करणे योग्य नसून लोकांवर अन्यायकारक कारवाई प्रशासनाने जबाबदारीने भूमिका घ्यावी झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल असे तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यावेळी म्हणाले. व आंदोलनाचा असा इशाराही त्यांनी दिला. “जर खरोखरच छत्रपती महाराज यांच्या स्मारकाला विरोध झाला असता, तर आम्ही स्वतः त्याविरोधात उभे राहिलो असतो, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती वेगळी आहे. आम्ही सर्वजण शिवरायांच्या विचारांचे पायिक आहोत आणि कायद्याच्या चौकटीत राहूनच भूमिका मांडणे हे आमचे कर्तव्य आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणात जे कोणी प्रत्यक्ष दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, मात्र निरपराध प्रशासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता पुराव्यांच्या आधारे निर्णय घ्यावेत आणि संपूर्ण सत्य पारदर्शकपणे जनतेसमोर मांडावे, अशी
अपेक्षा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी व्यक्त केली. याचबरोबर दोन्हीकडे मंडळींनी समाजात शांतता, कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याचे आवाहन ही त्यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!