एसटी बस आणि मोटरसायकलच्या भिषण अपघातात पतीचा जागीच मृत्यु, तर पत्नी गंभीर जखमी..( चिखली ते देऊळगाव राजा रोडवरील बेराळा फाट्यावरील घटना )
चिखली (एकनाथ माळेकर)तालुक्यातील केळवद येथील गायकवाड दांपत्य दि. २३ फेब्रुवारी रोजी सोमवार असल्याने जांभोरा येथील येल्होजी महादेवाच्या दर्शनासाठी मोटरसायकलने जात होते. दरम्यान सकाळी ९ च्या दरम्यान बेराळा फाट्यावर देऊळगाव राजा कडून येणाऱ्या हिंगणघाट डेपोची एसटी बस छत्रपती संभाजी नगर ते हिंगणघाट बस क्र. ( एम एच १४ एम एच ०८७२ ) ने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. हि धडक एवढी भयानक होती कि, बसने मोटरसायकल १५ ते २० फुटांपर्यंत चिरडत नेली. यात संजय पांडुरंग गायकवाड ( रा. केळवद वय ५८ वर्ष ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी सौ. शिला संजय गायकवाड ( रा. केळवद वय ५० वर्ष ) ह्या गंभीर जखमी झाल्या.अपघातात घडताच स्थानीकांनी धाव घेऊन दोन्ही पती पत्नीला चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी संजय गायकवाड यांना मृत घोषित केले. तर गंभीर जखमी असलेल्या शिला गायकवाड यांच्यावर उपचार सुरू आहेत.सदरचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. चिखली पोलीसांनी एसटी बस आणि चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
