किनगाव जट्टू येथे गाडगे महाराज जयंती साजरी…
सिंदखेडराजा( अनिल दराडे ) लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे, श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक बाल विकास केंद्र मध्ये, गाडगे महाराज जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक विश्वनाथ वाघमारे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रामदास मुर्तडकर, फिरोज भाई, सेवानिवृत्त मुख्याध्यापक शामराव सातपुते,, यावेळी सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते राजेश नागरे, व रुद्र सातपुते, यांनी आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ वाघमारे यांनी गाडगेबाबांचे विचार, समाजाला समजावून सांगितले, आणि त्यांचे विचार आत्मसात करून आपल्या जीवनाची वाटचाल करणे आवश्यक आहे हेही त्यांनी सांगितले, तसेच ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते, यांनी आपले विचार व्यक्त करताना, स्वच्छता ही काळाची गरज असून, त्यासाठी प्रत्येकाने आपले गर्व घरा शेजारचा परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे, पाण्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक पालकाने आपल्या मुलांना शाळेत पाठवून शिक्षण देणे काळाची गरज आहे, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवाजी राऊत, राजाभाऊ राऊत, विजय राऊत, रघु राऊत, बळी राऊत, बबन राऊत, यांनी परिश्रम घेतले, शेवटी राऊत परिवाराच्यावतीने, कार्यक्रमाला आलेल्या सर्वंसाठी पोह्यांची व्यवस्था करण्यात आली होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते यांनी केले.
