कव्हळा शाळेची ‘NMMS’ परीक्षेत झेप; १६ पैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण!​गुणवत्तेची परंपरा कायम: गेल्या ४ वर्षात ४० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती….​

IMG-20260226-WA0007

चिखली ( बुलढाणा माझा न्युज ): तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा, कव्हळा (केंद्र- शेलसूर) येथील विद्यार्थ्यांनी ‘एन.एम.एम.एस.’ (NMMS) शिष्यवृत्ती परीक्षेत यंदाही घवघवीत यश संपादन करून शाळेच्या गुणवत्तेचा झेंडा फडकवला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या एकूण १६ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, शाळेने यशाची ही परंपरा अखंडित राखली आहे.​शाळेचा दबदबा कायमग्रामीण भागातील विद्यार्थी देखील स्पर्धा परीक्षेत मागे नाहीत, हे कव्हळा शाळेने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. केवळ यावर्षीच नव्हे, तर गेल्या ४ वर्षांच्या कालावधीत या शाळेतील एकूण ४० विद्यार्थ्यांनी एन.एम.एम.एस. शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे. शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या जोरावर ही शाळा तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.​यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे कौतुकया दैदिप्यमान यशाबद्दल मार्गदर्शक शिक्षक विलास पऱ्हाड सर, मुख्याध्यापक आणि इतर सर्व शिक्षक वृंदाचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. पऱ्हाड सरांच्या विशेष मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना या कठीण परीक्षेत यश मिळवणे सुलभ झाले, अशा भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.​शाळा व्यवस्थापन समिती आणि पालकांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांना घडविणाऱ्या शिक्षकांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल केंद्र शेलसूर आणि पं. स. चिखली शिक्षण विभागातूनही कौतुक होत आहे.​”गुणवत्तेची ही परंपरा अशीच पुढे चालू राहील. विद्यार्थ्यांचे यश हे त्यांच्या मेहनतीचे आणि आमच्या शाळेतील टीमवर्कचे फळ आहे.”— शाळा व्यवस्थापन समिती, कव्हळा

You may have missed

error: Content is protected !!