विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी पवन भालेराव…

Screenshot_2026-02-26-07-57-59-39_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

बुलढाणा :- विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सव हा बुलढाणा शहरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती पासून सुरु झालेला हा उत्सव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी भव्य रॅलीत रूपांतरीत होऊन लाखोंच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो या कार्यक्रमाच्या नियोजनची भूमिका सार्वजनिक जयंती उत्सव समिती पार पाडत असते. यावर्षीच्या बुलढाणा शहर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष पवन भालेराव यांची निवड करण्यात आली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती ची सोमवार दि. 23 फेब्रुवारी 2026 रोजी विश्राम भवन येथे नवीन अध्यक्ष निवडण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी 2025 चे अध्यक्ष निलेश राऊत हे होते. उत्सव समितीने अजित केलेल्या विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा लेखाजोखा प्रस्ताविकेतून आशिष बाबा खरात यांनी मांडला.बैठकीचे अध्यक्ष निलेश राऊत यांनी 2025 मध्ये आयोजित केलेल्या वर्षभरातील विविध कार्यक्रमांचा आढावा व आयोजन सहकार्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले व यावर्षीचा नियोजनाचा प्रस्ताव व या बैठकीत मांडला नवनियुक्त अध्यक्ष पवन भालेराव यांनी या वर्षी जयंती ही नाविन्यपूर्ण व ऐतिहासिक करण्यासाठी समाज बांधवांनी सहकार्य करावे ही आशा व्यक्त केली. या वेळी आशिष बाबा खरात नगरसेवक प्रशांत जाधव वैशालीताई ठाकरे गणेश इंगळे निलेश गायकवाड कुणाल पैठणकर अमोल खरे अमोल वाठोरे उमेश हेलोडे सनी पैठणे मंगेश इंगळे या बैठकीत बुलढाणा शहरातील तरुण वर्ग उपस्थित होता.

You may have missed

error: Content is protected !!