उमरद येथे बालविवाह प्रतिबंधक शपथ
सिंदखेडराजा (अनिल दराडे ) सिंदखेडराजा तालुक्यातील, जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेत 23 फेब्रुवारीला, बालविवाह प्रतिबंधक शपथ घेण्यात आली, यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते, विद्यार्थ्यांना अल्पवयीन विवाहाचे भविष्यात होणारे दुष्परिणाम, समजावून सांगितले. त्याचप्रमाणे मुलीचे शिक्षण प्रगतीचे लक्षण असून, मुलासोबत मुलींना शिक्षण देणे काळाची गरज आहे. आणि मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभे राहणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण, तसेच मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच विवाह करावा, आणि आपल्या घरामध्ये अल्पवयीन विवाह होत असेल तर, आपण त्यांना समजावून सांगून सदर अल्पवयीन विवाह होणार नाही, याची दक्षता घ्यावी, याबाबत जाणीव जागृती करण्यात आली. यावेळी सदर कार्यक्रमाला मुख्याध्यापक भानुदास दराडे, सहाय्यक शिक्षक ज्ञानेश्वर घुगे, रमेश महाडिक, अनिल शिंदे, पंढरीनाथ मुरकुट, शरद नागरे, जगदीश तारे, प्रभाकर गोरे, आधी शिक्षक उपस्थित होते, सरते शेवटी विद्यार्थ्यांनी बालविवाह प्रतिबंधक शपथ घेऊन, कार्यक्रमाची सांगता झाली
