खामगाव शहर पोलीस ठाण्यातर्फे ज्येष्ठ साहित्यिका डॉ. ऊर्मिला ठाकरे यांचा गौरव​मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा; ‘ज्ञानसंस्कार’ हस्तलिखित ग्रंथ पोलीस प्रशासनाला भेट…​

IMG-20260228-WA0006

खामगाव ( बुलढाणा माझा न्युज ): मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने परिसरातील ज्येष्ठ साहित्यिका, प्रबोधनकार, समाजसेविका तथा माजी शिक्षण विस्तार अधिकारी ‘वनश्री’ डॉ. ऊर्मिला श्रीकृष्ण ठाकरे यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. पोलीस प्रशासनाने साहित्याचा आणि साहित्यिकाचा सन्मान केल्यामुळे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.​पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांच्या हस्ते सन्मान शुक्रवार, दि. २७ फेब्रुवारी रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण पवार आणि पोलीस उपनिरीक्षक सौ. रिनाताई सदार-इंगळे यांच्या शुभहस्ते डॉ. ऊर्मिला ठाकरे यांना शाल, पुस्तक आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. यावेळी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.​’ज्ञानसंस्कार’ ग्रंथाची अनमोल भेट सत्काराला उत्तर देताना डॉ. ऊर्मिला ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. “मराठी भाषा गौरव दिनानिमित्त एका मराठी साहित्यिकाचा असा यथोचित गौरव करणे, हा मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान आहे,” असे भावोद्गार त्यांनी काढले. याच प्रसंगी त्यांनी स्वतः लिहिलेला ४९८ पृष्ठांचा ‘ज्ञानसंस्कार’ हा हस्तलिखित ग्रंथ ठाणेदार श्री. रामकृष्ण पवार यांना पोलीस स्टेशनच्या संग्रहासाठी भेट दिला.​कर्मचाऱ्यांचे परिश्रम या कार्यक्रमाचे नेटके संचालन आणि आभार प्रदर्शन गोपनीय विभागाचे हेड कॉन्स्टेबल श्री. नितीन पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी बांधवांनी विशेष परिश्रम घेतले. पोलीस ठाण्यात पार पडलेल्या या साहित्यिक उपक्रमाची शहरात चर्चा होत आहे.

You may have missed

error: Content is protected !!