राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयातर्फे डॉ. मनीषा कोठेकर यांचा सन्मान…

IMG-20260228-WA0000

शेगाव :- संतनगरी श्रीक्षेत्र शेगाव येथे आयुष मंत्रालय, भारत सरकार व अखिल भारतीय आर्युवेद महासंमेलनाच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय ‘राष्ट्रीय आरोग्य मेळावा २०२६’ चा उत्साहात शुभारंभ नुकताच देशाच्या महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या शुभ हस्ते करण्यात आला असून सदर ऐतिहासिक सोहळ्याप्रसंगी द्वितीय दिवसाच्या प्रथम सत्रात भारतीय चिकित्सा पद्धती, राष्ट्रीय आयोगाच्या नवनियुक्त अध्यक्षा सन्माननीय डॉ. सौ मनीषा उपेंद्र कोठेकर यांचे स्त्री आरोग्यासंदर्भात अत्यंत महत्वाचे व्याख्यान आयोजित केले होते. सदर व्याख्यानांत राज्यभरातून विविध महाविद्यालयातून महिला अध्यापक व विद्यार्थिनींची संख्या लक्षणीय होती. यावेळी बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयाच्या सर्व अध्यापक व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. भारतीय चिकित्सा पद्धती, राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती झाल्याबद्दल सन्माननीय डॉ. सौ मनीषा उपेंद्र कोठेकर यांचा हृदयपूर्वक सन्मान व सत्कार बुलढाणा येथील राजर्षी शाहू महाराज आयुर्वेद महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मा. ध्रुपदराव सावळे पाटील व सहसचिव अँड. कीर्तिताई सावळे – पऱ्हाड यांच्या मार्गदर्शनात, प्राध्यापक वृंद, विद्यार्थी व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यावतीने करण्यात आला, यावेळी महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी सत्यघोष बाहेकर, उपप्राचार्य डॉ. प्रितमसिंग ठाकूर, सहयोगी प्राध्यापक डॉ. भागवत वसे, सहाय्यक प्राध्यापक डॉ. तुषार देखणे, प्रसिद्धी प्रमुख दिपक पुराणे व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!