जि. प .शाळा टिटवी येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या जल्लोषात साजरे

IMG-20260303-WA0044

लोणार (यासीन शेख): जिल्हा परिषद मराठी केंद्रिय उच्च प्राथमिक शाळा टिटवी, तालुका लोणार, येथे दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.वार्षिक स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष राजेशजी अंबुस्कार (उपाध्यक्ष स्वस्त धान्य दुकानदार,महाराष्ट्र राज्य), कार्यक्रमाचे उद्घाटन बळीभाऊ मापारी (शिवसेना जिल्हाप्रमुख व सभापती कृ.उ.बा.स.लोणार) यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रकाश सदगीर ठाणेदार लोणार,रामप्रसाद डोळे (नायब तहसीलदार, लोणार),नंदुभाऊ मापारी (अध्यक्ष, शिवछत्र मंडळ), विजय पोफळे (मंडळाधिकारी, टिटवी सर्कल), गु.द.राठोड साहेब शिक्षण विस्तार अधिकारी, विजय सानप (अभिनेता, मुंबई),श्रीमती गोदावरी ताई कोकाटे (जि. प. सदस्या)इ.मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.तसेच मोतीराम डव्हळे साहेब (माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती लोणार), संजू भाऊ पवार, तेजनकर साहेब, आघाव मामा,रामदास तनपुरे, नसीम सर,उत्तमराव सानप (सरपंच नांद्रा), विलास मोरे (सरपंच धाड), सदाशिव साबळे सर माजी प्राचार्य श्री शिवाजी हायस्कूल सुलतानपूर, विजय सरकटे सर,विनायक तुपकर सर,शिवाजी डोंगरदिवे सर,समाधान सानप सर, यादव डोळे सर,चव्हाण सर ,श्रीमती प्राजक्ता मॅडम सामाजिक अंकेक्षण सर्वेक्षण मंत्रालय, मुंबई, इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित राहिले. सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन प्रतिमापूजन,मान्यवरांचा सत्कार व गु.द.राठोड साहेब (शिक्षण विस्तार अधिकारी) यांचा सेवापूर्ती सोहळ्यानिमित्त विशेष सत्कार,ऋषिकेश जाधव यांचा सरळ सेवा भरतीद्वारे लिपीक यापदावर नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या कलागुणांना नृत्याला आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांना वाव मिळावा या हेतूने आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय उत्साह पूर्ण वातावरणामध्ये पार पडले यामध्ये डान्स, नागसेन साबळे सर व त्यांचा टीम यांचे “आमची जिल्हा परिषद शाळा” या गाण्यावरचा डान्स विशेष आकर्षण राहिले.कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन जि.प.शाळा व भगवानराव आश्रुजी कोकाटे (मा. संचालक कृ.उ.बा.स.लोणार तथा जिल्हाध्यक्ष बिरसा मुंडा संघटना,बुलडाणा) यांच्याकडून करण्यात आले.तसेच सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती अनुसयाताई प्रताप नरवाडे (सरपंच टिटवी), सर्व ग्रामपंचायत सदस्य, सुनील केशव खरात (अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, टिटवी), श्यामभाऊ तनपुरे, (उपाध्यक्ष, शा. व्य. स.टिटवी), सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, टिटवी, मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद इत्यादींचे सहकार्य लाभले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय सोनुने सर, साऊंड सिस्टिम नियोजन अमोल मुसदवाले सर, ड्रेस मेकअप नियोजन सचिन आवारे सर, श्रीमती शिंदे मॅडम,प्रवीण मगर सर,व बक्षीस विभाग संजय नागरे सर व नागेश कदम सर तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागसेन साबळे सर मुख्याध्यापक टिटवी यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!