मातीमध्ये हात, देशासाठी साथ!” या घोषवाक्याखाली झाडलावणी मोहिमेच्या लोगोचे उद्घाटन

IMG-20250622-WA0023

दिल्ली (एकनाथ माळेकर)चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन (CIO) एक महिन्याची देशव्यापी झाडलावणी मोहीम राबवणार चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन (CIO) तर्फे २५ जूनपासून सुरू होणाऱ्या एक महिन्याच्या देशव्यापी झाडलावणी मोहिमेच्या लोगोचे आज अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्यालयात करण्यात आले होते, ज्यात महिलांबरोबरच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

या मोहिमेअंतर्गत देशभरात १० लाख झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला असून, मोहिमेचा घोषवाक्य आहे – “मातीमध्ये हात, देशासाठी साथ!”. या मोहिमेद्वारे देशभरात पर्यावरण रक्षण आणि वृक्षलागवडीचे महत्त्व जनतेपर्यंत पोहोचवले जाणार आहे.

कार्यक्रमात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपअमीर एस. अमीन उल हसन यांनी विशेष अतिथी म्हणून लोगोचे उद्घाटन केले आणि मोहिमेस शुभेच्छा दिल्या. त्यांनी लहान मुलांना संबोधित करताना सांगितले की, “स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त भविष्यासाठी प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत.” त्यांनी पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणावर चिंता व्यक्त करत, झाडे लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

या वेळी CIOचे सचिव सैयद तनवीर अहमद यांनीही मुलांना झाडांचे जीवनातील महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी सांगितले की, झाडांमुळे अन्न, प्राणवायू (ऑक्सिजन) आणि निसर्गसौंदर्य मिळते. यामध्ये मुलांना झाडांबाबत प्रेम निर्माण होऊन त्यांच्यात पर्यावरण संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकी वाढेल, असा या मोहिमेचा उद्देश आहे.

चिल्ड्रेन इस्लामिक ऑर्गनायझेशन (CIO) ही संस्था ५ ते १० वयोगटातील मुले व मुलींच्या धार्मिक व सामाजिक शिक्षणासाठी कार्यरत आहे. या मोहिमेद्वारे पर्यावरण जागृतीबरोबरच मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण करणे हा उद्देश आहे.

कार्यक्रमात जमाअत-ए-इस्लामी हिंदचे पदाधिकारी, महिला आणि मुले मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may have missed

error: Content is protected !!