बुलढाणा-चिखली रोडवर काळाचा घाला! दोन दुचाकींच्या भीषण धडकेत दोन तरुणांचा जागीच मृत्यू​

Screenshot_2026-03-07-22-03-29-37_3a637037d35f95c5dbcdcc75e697ce91

चिखली (बुलढाणा माझा न्यूज):चिखली-बुलढाणा मार्गावर अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नसून, आज संध्याकाळी एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. हातनी-चिखली रोडवर दोन दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना शनिवारी संध्याकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. दत्तात्रय वाघ (वय ३४, रा. मोसंबेवाडी, ता. जानेफळ) हे आपल्या दुचाकीने हातनी-चिखली-बुलढाणा मार्गावरून जात होते. दरम्यान, समोरून येणारे सुमीत तेलकर (रा. बुलढाणा) यांच्या दुचाकीची आणि वाघ यांच्या दुचाकीची समोरासमोर अत्यंत भीषण धडक झाली.​ही धडक इतकी जोरदार होती की, दोन्ही दुचाकीस्वार रस्त्यावर फेकले गेले. अपघाताचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, गंभीर दुखापत झाल्यामुळे दत्तात्रय वाघ आणि सुमीत तेलकर या दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता. धडकेत दोन्ही दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्या पूर्णपणे क्षतिग्रस्त झाल्या आहेत.चिखली-बुलढाणा मार्गावर दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. वेगावर नियंत्रण नसल्यामुळे किंवा रस्ते सुरक्षेच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अशा दुर्दैवी घटना घडत असल्याच्या चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहेत. या अपघातानंतर परिसरात शोककळा पसरली असून पोलीस प्रशासनाकडून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.

You may have missed

error: Content is protected !!