आरोग्य जनजागृतीसाठी तरुण डॉक्टर सरसावले; डॉ. तुषार गोंधणे यांचा जिल्ह्यात सामाजिक पुढाकार​ चिखली येथील त्वचारोग तज्ज्ञाचा उपक्रम : गोरगरीब रुग्णांना परवडणारे उपचार देण्याचा मानस

IMG-20260308-WA0018

चिखली ( बुलढाणा माझा वृत्तसेवा ):आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तसेच रासायनिक उत्पादने, वाढते प्रदूषण आणि अयोग्य औषधांच्या वापरामुळे त्वचा व केसांच्या समस्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेक नागरिक योग्य माहितीअभावी चुकीच्या उपचारांच्या जाळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर चिखली येथील तरुण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. तुषार गोंधणे यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत नागरिकांच्या आरोग्य जनजागृतीसाठी पुढाकार घेतला आहे.डॉ. गोंधणे हे केवळ चिखलीपुरते मर्यादित न राहता संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांमध्ये त्वचा व केसांच्या आजारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नागरिकांना योग्य आरोग्य माहिती मिळावी, चुकीच्या औषधोपचारांपासून लोकांनी दूर राहावे आणि योग्य वेळी योग्य उपचार मिळावेत, यासाठी ते विविध माध्यमांतून मार्गदर्शन करत आहेत.गोरगरीब व सर्वसामान्य जनतेपर्यंत परवडणारी आणि योग्य आरोग्य सेवा पोहोचवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू रुग्णांची सेवा करण्याच्या हेतूने त्यांना योग्य वैद्यकीय सल्ला व उपचार मिळावेत, यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.भविष्यात बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांत आरोग्य जनजागृती कार्यक्रम, आरोग्य शिबिरे आणि मार्गदर्शन उपक्रम राबवून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्याचा त्यांचा मानस आहे.

प्रतिक्रिया:

“आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत योग्य आरोग्य सेवा पोहोचणे ही डॉक्टर म्हणून आपली सामाजिक जबाबदारी आहे. याच भावनेतून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत.”— डॉ. तुषार गोंधणे, त्वचारोग तज्ज्ञ, चिखली..

तुषार गोंधणे यांच्या या सामाजिक पुढाकाराचे चिखलीसह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात स्वागत होत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक बदल घडतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!