सर्वसामान्य माणसाची कामे एकाच छताखाली व्हावी हा शासनाचा उद्देश :— तहसीलदार अजित दिवटे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचा थाटात शुभारंभ

IMG-20260308-WA0005

सिदखेडराजा (अनिल दराडे ) सर्वसामान्य माणसाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी साखरखेर्डा ते सिंदखेडराजा हे ६० किमी चे अंतर कापून यावे लागते . ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेला या कामासाठी आता यावे लागू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे प्रत्येक मंडळात आयोजन केले आहे . त्याचा पहिला टप्पा साखरखेर्डा पासून सुरु करण्यात आला आहे . असे प्रतिपादन तहसीलदार अजित दिवटे यांनी शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी केले . यावेळी शिवसेना नेते योगेश जाधव , सरपंच सौ ज्योती अमित जाधव , माजी सरपंच महेंद्र पाटील , भाजपाचे प्रदेश सदस्य उल्हास देशपांडे , अमित जाधव , शिवसेना नेते गंभिरराव खरात , भाजपा शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष दसरे , माजी सरपंच चंद्रशेखर शुक्ल , कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप बेंडमाळी , शिदींचे सरपंच अशोक खरात , गोरेगावचे सरपंच वसुदेव पंचाळ , गोपाल राजपूत , शुभम राजपूत , गणपत अवचार , माधव नाईक , यासह शासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . महसूल विभागाच्या प्रलंबित फेरफार , सातबारा उताऱ्यातील चुकांची दुरुस्ती , डिजिटल स्वाक्षरी चे सातबारा उताऱ्याचे वाटप , उत्पन्न रहिवासी व जातीचे प्रमाणपत्र , नाॅन क्रिमीलेयर प्रमाणात, अकृषिक तरतुदी बाबत मार्गदर्शन व सुचना , सनद प्रक्रियेची माहिती , सामाजिक अर्थसाहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे , विद्यार्थ्यांना दाखले वाटप करणे , तुकडेबंदी कायद्याच्या उल्लघनाबाबतच्या प्रकरणाचा निपटारा, पांदन रस्ताच्या प्रशासकिय मान्यतेचे आदेश , घरांसाठी पट्टे वाटप व ई मोजणी अर्ज , ॲग्रिस्टॅक आणि पी एम किसान नोंदणी यावर तहसीलदार यांनी सविस्तर मार्गदर्शन केले . तसेच कृषी विभागाच्या वतीने १३ शेतकऱ्यांना अनुदान तत्वावर ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले . अनेकांना घरकुल योजनेसाठी नियमाकुलचे दाखले वाटप करण्यात आले . शासनाच्या योजनांची अंमलबजावणी हा मुख्य उद्देश:— योगेश जाधव २०२२ -२३ साली तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शिबीराची सुरुवात केली . त्यामुळे सर्वसामान्य जनतेची कामे लवकर होण्याला मदत मिळाली . आता याच धर्तीवर छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . यामुळे शासनाच्या योजनांची माहिती थेट तुमच्या पर्यंत पोहोचेल आणि आपली कामे झटपट होतील . साखरखेर्डा येथे अप्पर तहसीलदार कार्यालय प्रस्तावित आहे . ते सुरु झाल्यानंतर सर्वसामान्य जनतेला सिंदखेडराजा येथे जावे लागणार नाही . अशी माहिती युवासेना नेते योगेश जाधव यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली . या शिबिरात महसूल विभागाचे सर्व अधिकार उपस्थित असताना पंचायत समिती मधील एकही अधिकारी उपस्थित नव्हता . तसेच विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता , भुमि अभिलेख विभागाचे अधिकारी अनुपस्थित होते . शिबीराच्या यशस्वीतेसाठी महसूल मंडळाधिकारी रघुनाथ सोळंके , ग्राम महसूल अधिकारी संजय शिंगणे ,आनंद राजपूत ,प्रशांत पोंधे , लखन राजपूत , गिऱ्हे , कृषी अधिकारी गणेश बंगाळे , छबुलाल कोल्हे , महसूल कर्मचारी संजय सोनवणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महसूल अधिकारी शिवानंदन वाकदकर यांनी केले .

You may have missed

error: Content is protected !!