जिजाऊ-सावित्रीच्या लेकींचा सन्मान; सिंदखेड राजा तालुक्यातील रूम्हना येथे महिला दिन सोहळा संपन्न…

IMG-20260308-WA0003

सिंदखेडराजा (अनिल दराडे) सिंदखेड राजा रूम्हना येथे जागतिक महिला दिन साजरा सिंदखेड राजा तालुक्यातील ग्रामपंचायत रूम्हना येथे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच शिवगंगा जायभाये होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धनश्री कायंदे, आरोग्य सेविका वैशाली गवई, तालुका अभियान व्यवस्थापक शिवहरी झोटे, ईश्वर दळवी, मुकिंदा उघडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात, आरोग्य सेवक विजय खोडके, प्राचार्य शिवराज कायंदे, ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तदनंतर प्राचार्य शिवराज कायंदे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. तदनंतर अर्चना आघाव, लता कायंदे, प्रिया खरात, वैशाली गवई, मालता काळे, नीता डोळे, साधना खरात, लता जायभाये, गोकर्ण पाखरे, यशोदा मांटे, स्वाती शिनगारे आधी महिला कर्मचाऱ्यांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले, तर वैशाली गवई यांनी सांगितले की, आरोग्य हीच माणसाची संपत्ती असून, महिलांनी दैनंदिन कामकाज करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने 14-15 वयोगटातील मुलींसाठी नवीन लस निघालेली आहे. ती मुलींनी आवर्जून घ्यावी सोबतच त्यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे धनश्री कायंदे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन सक्षम होणे गरजेचे आहे, व स्वावलंबी जीवन जगले पाहिजे असे सांगितले, अनेकांनी मार्गदर्शन करून महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन नीता डोळे यांनी केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ जायभाये, प्रकाश जायभायये, यांच्यासह अनेक महिलांनी परिश्रम घेतले.लुक्यातील ग्रामपंचायत रूम्हना येथे 8 मार्च जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच शिवगंगा जायभाये होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. धनश्री कायंदे, आरोग्य सेविका वैशाली गवई, तालुका अभियान व्यवस्थापक शिवहरी झोटे, ईश्वर दळवी, मुकिंदा उघडे, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक प्रकाश खरात, आरोग्य सेवक विजय खोडके, प्राचार्य शिवराज कायंदे, ग्रामविकास अधिकारी विनोद सातपुते उपस्थित होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले, तदनंतर प्राचार्य शिवराज कायंदे यांनी प्रास्ताविक करून महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले. तदनंतर अर्चना आघाव, लता कायंदे, प्रिया खरात, वैशाली गवई, मालता काळे, नीता डोळे, साधना खरात, लता जायभाये, गोकर्ण पाखरे, यशोदा मांटे, स्वाती शिनगारे आधी महिला कर्मचाऱ्यांचा मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त केले, तर वैशाली गवई यांनी सांगितले की, आरोग्य हीच माणसाची संपत्ती असून, महिलांनी दैनंदिन कामकाज करून आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे, त्याचप्रमाणे आरोग्य विभागाच्या वतीने 14-15 वयोगटातील मुलींसाठी नवीन लस निघालेली आहे. ती मुलींनी आवर्जून घ्यावी सोबतच त्यांनी आरोग्याबाबत मार्गदर्शन केले, तर कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे धनश्री कायंदे यांनी विचार व्यक्त करताना सांगितले की, शिक्षण ही काळाची गरज असून प्रत्येक मुलीने शिक्षण घेऊन सक्षम होणे गरजेचे आहे, व स्वावलंबी जीवन जगले पाहिजे असे सांगितले, अनेकांनी मार्गदर्शन करून महिला दिनाचे महत्त्व समजावून सांगितले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत अधिकारी विनोद सातपुते यांनी केले तर आभार प्रदर्शन नीता डोळे यांनी केली, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हरिभाऊ जायभाये, प्रकाश जायभायये, यांच्यासह अनेक महिलांनी परिश्रम घेतले.

You may have missed

error: Content is protected !!