हिंगणघाट-छ.संभाजीनगर मार्गे लोणार एकमेव बसफेरी सुरू!लोणार वरून छ.संभाजीनगर साठी संद्याकाळी ७:०० वाजता तर हिंगणघाटसाठी सकाळी ११:४५ ला सुटेल
लोणार (यासीन शेख) : प्रवाशी सेवा संघटना,लोणार यांच्या मागणीनुसार जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ लोणार मार्गे दि.०९ मार्च २६ सोमवार पासुन हिंगणघाट आगाराची हिंगणघाट-छ.संभाजीनगर हि नवीन हिंगणघाट करीता राज्य परिवहन महामंडळाची एकमेव बसफेरी प्रवाशांच्या वारंवार होणाऱ्या मागणीनुसार प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आली आहे.सदर बसफेरी हिंगणघाट येथुन सकाळी ०७.४५ वाजता निघुन वर्धा,यवतमाळ,दिग्रस, आर्णी,पुसद,अनसिंग,वाशिम, रिठद,रिसोड,भर,मोप,लोणी,लोणार, सुलतानपुर,बिबी, दुसरबीड,किंनगावराजा,सिंदखेडराजा,नाव्हा,जालना मार्गे रात्री १०.०० वाजता सिडको (छ.संभाजीनगर) येथे मुक्कामी पोहचेल दुसऱ्या दिवशी सिडको (छ.संभाजीनगर) बसस्थानक येथुन सकाळी ०८.०० वाजता हि बसफेरी हिंगणघाट करीता सुटुन ती रात्री १०.०० वाजता हिंगणघाट येथे पोहचेल. लोणार,रिसोड आणि वाशिम या तिन्ही शहरातुन हिंगणघाट करीता ही बसफेरी एकमेव बसफेरी आहे.सदर फेरी सुरू करुन प्रवाशांची प्रवासाची गैरसोय दुर केल्याबद्दल नितीन मैंद,महाव्यवस्थापक (वाहतुक)मुंबई,श्रीकांत गभणे,प्रादेशिक व्यवस्थापक,नागपुर,भगवान जगणोर,विभाग नियंत्रक,वर्धा,स्वाती तांबे मॅडम,विभागीय वाहतुक अधिकारी,वर्धा आणि गौतम शेंडे, आगार व्यवस्थापक,हिंगणघाट यांचे प्रवाशी सेवा संघटनेच्या अध्यक्ष,उस्मान शेख,सचिव भागवत खरात आणि उपाध्यक्ष अशोक काटकर यांनी आभार व्यक्त केले असुन प्रवाशी,पर्यटक,व्यापारी,रुग्ण,भक्तगण आणि विद्यार्थी यांनी सुरू करण्यात आलेली एकमेव बसफेरीचा लाभ घ्यावा असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
