शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग अंत्री खेडेकर शिवारात फुलले चियाचे पिक

IMG-20260308-WA0002

चिखली :-शेतीमध्ये सातत्याने होणारे नुकसान आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे अनेक शेतकरी हवालदार झाले आहेत मात्र बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील एकनाथ माळेकर या शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाट देत चिया या विदेशी पिकाची यशस्वी लागवड केली आहे केवळ दीड एकर क्षेत्रातुन त्यांनी लाखोच्या उत्पन्नाची आशा पल्लवीत केली आहे तरुण शेतकरी एकनाथ माळेकर यांनी आपल्या दीड एकर शेताची या पिकाची लागवड केली आहे या पिकासाठी त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध खर्च केला असून मशागत नागरणी बियाणे पेरणी खते फवारणी आणि मजुरी असा सर्व मिळून केवळ 20500 खर्च आला आहे चिया हे पीक चार ते साडेचार महिन्यात काढणीला येते एकरी केवळ 1.5 किलो बियाणे लागवडीसाठी पुरेसे ठरत असून दीड एकरातुन आठ ते दहा क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे या पिकाला वाशीम येथील बाजारपेठ उपलब्ध असून सध्या चियाला बाजारामध्ये मोठी मागणी आहे चिया सीड्स मध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि फायबरचे प्रमाण भरपूर असल्याने आरोग्याच्या दृष्टीने याला मोठी मागणी आहे कमी पाण्यात आणि कमी खर्चात येणारे हे पीक असल्याने एकनाथ माळेकर यांचा हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी ही दिशादर्शक ठरणार आहे कमी खर्चात आणि कमी मशागतीत अधिक नफा देणारे पीक शोधत असताना मीच या पिकाची निवड केली केवळ वीस हजार पाचशे रुपयांच्या खर्चात आठ ते दहा क्विंटल उत्पन्नाची खात्री असल्याने हे पीक आर्थिक प्रगतीसाठी उत्तम पर्याय आहे एकनाथ माळेकर प्रगतशील शेतकरी अंत्री खेडेकर

You may have missed

error: Content is protected !!