सिंदखेडराजा तहसीलच्या अभिलेखाला ‘नवी संजीवनी’; जीर्ण दस्तऐवजांचे ‘युद्धपातळीवर’ जतन!

Screenshot_2026-03-08-18-40-47-48_6012fa4d4ddec268fc5c7112cbb265e7

सिंदखेडराजा( अनिल दराडे ) सिंदखेडराजा:तहसील कार्यालयातील अभिलेख (रेकॉर्ड) विभाग हा प्रशासनाचा कणा मानला जातो. ५० वर्षांपूर्वीचे जुने दस्तऐवज, वडिलोपार्जित जमिनीचे उतारे आणि महत्त्वाचे पुरावे याच विभागातून जनतेला उपलब्ध करून दिले जातात. मात्र, सततच्या वापरामुळे जीर्ण झालेल्या या कागदपत्रांना आता सिंदखेडराजा तहसील प्रशासनाने ‘नवी संजीवनी’ देण्याचे काम हाती घेतले आहे.दैनंदिन कामासाठी शेतकरी वर्ग आणि शैक्षणिक दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांची या विभागात मोठी गर्दी असते. जुने रेकॉर्ड हाताळताना ते फाटण्याची भीती असते, तसेच कर्मचाऱ्यांनाही विस्कळीत कागदपत्रांमुळे त्रास सहन करावा लागतो. ही समस्या ओळखून प्रशासनाने ऐतिहासिक महत्त्वाच्या कागदपत्रांचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेतला आहे. *प्रशासकीय पुढाकार आणि युद्धपातळीवर काम* तहसीलदार अजित दिवटे यांच्या सूचनेनुसार आणि नायब तहसीलदार प्रांजल पवार यांच्या थेट मार्गदर्शनाखाली हा विशेष उपक्रम राबविला जात आहे. अभिलेख विभागाचे महसूल सहाय्यक जे.एच. सिपे आणि त्यांचे सहकारी सध्या अत्यंत काळजीपूर्वक आणि युद्धपातळीवर ही मोहीम राबवत आहेत. जीर्ण आणि फाटलेल्या अवस्थेतील कोतवाल बुकांची विशेष बाइंडिंग (बेडिंग) करून ती सुस्थितीत आणली जात आहेत. या प्रक्रियेमुळे कागदपत्रांचे आयुष्य वाढले असून, भविष्यात हे दस्तऐवज हाताळणे सोपे आणि सुरक्षित होणार आहे.नीटनेटकेपणामुळे जनतेला वेळेत आणि सुलभतेने हवे असलेले रेकॉर्ड मिळण्यास मदत होईल.प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेमुळे आणि कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळे सर्वसामान्यांचे काम अधिक सोपे होणार आहे. कागदपत्रांच्या या ‘कायाकल्पा’बद्दल तहसीलदार, नायब तहसीलदार आणि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

You may have missed

error: Content is protected !!